शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
3
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
4
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
5
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
6
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
7
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
8
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
9
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
10
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
11
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
12
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
13
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
14
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
15
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
16
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
17
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
18
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
19
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
20
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील ३५७ प्राथमिक शाळांसाठी ११० कोटींचा निधी, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:21 IST

या २४ सुविधा, उपक्रम; कार्तिकेयन एस. यांनी केले सादरीकरण

कोल्हापूर : समृद्ध शाळा योजनेतून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३५७ प्राथमिक शाळांमध्ये २४ प्रकारच्या भौतिक सुविधा देण्यात येणार असून, यासाठी ११० रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जिल्हा नियोजन समिती बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी या योजनेचे सादरीकरण केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.याबाबत अधिक माहिती देताना कार्तिकेयन एस. म्हणाले, जिल्ह्यात १९५७ शाळा असून प्रत्येक शाळेच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. या शाळांवर निधी खर्च होतो. परंतु, त्यामध्ये एकजिनसीपणा येत नाही. त्यामुळे गेले दीड वर्षे याबाबत सर्वेक्षण, चर्चा करून हा आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार त्या-त्या शाळांच्या गरजेनुसार २४ प्रकारच्या सुविधा प्रत्येक शाळेत निर्माण करून देण्यात येणार आहेत.आधुनिक नवीन शाळा इमारत, उपलब्ध शाळेत गरज असलेल्या सुविधांची निर्मिती, अतिदुर्गम, धनगरवाड्यावरील शाळांना भौतिक सुविधा आणि नैसर्गिक आपत्तीवेळी साहाय्यभूत ठरणाऱ्या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी अशा चार टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. अशा पद्धतीने पाच वर्षांत या सर्व शाळांचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक निधी, खासदार, आमदार निधी, स्वयंसेवी संस्था आणि सीएसआरमधून निधी उभारण्यात येणार आहे.

५४ शाळांमध्ये आधुनिक स्वच्छतागृहेजिल्ह्यातील ५४ शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात ६ कोटी ३ लाख रुपये खर्च करून आधुनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी सांगितले. तीन प्रकारच्या स्वच्छतागृहांचे नियोजन करण्यात आले असून, तेथील विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध सुविधा याचा विचार करून ही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. यावेळी सर्व शिक्षा अभियानचे अभियंता अमोल पाटील उपस्थित होते.

या २४ सुविधा, उपक्रमनवीन वर्गखोल्या, शाळा दुरुस्ती, नवीन स्वच्छतागृह, स्वच्छतागृह दुरुस्ती, हॅंडवॉश स्टेशन्स, नवीन संरक्षक भिंत, संरक्षक भिंत दुरुस्ती, बाल रचना व रंगकाम, स्वागत कमान, विद्युत सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वयंपाकगृह, परसबाग, वृक्ष लागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापन, क्रीडा साहित्य, क्रीडांगण विकास, प्रयोगशाळा, आवश्यक फर्निचर, आरओ वॉटर, ध्वनी सुविधा, आवश्यक टेबल, बेंच, सौर विद्युत व्यवस्था.