आंबेओहळ प्रकल्पाची पूर्तता हा आयुष्यातील मोठा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST2021-07-18T04:17:32+5:302021-07-18T04:17:32+5:30
उत्तूर : आंबेओहळ प्रकल्प हा उत्तूर विभागासह कडगाव-गिजवणे विभागाच्या हरितक्रांतीचा वरदायिनी आहे. या प्रकल्पाची पूर्तता माझ्या आयुष्यातील मोठा ...

आंबेओहळ प्रकल्पाची पूर्तता हा आयुष्यातील मोठा आनंद
उत्तूर : आंबेओहळ प्रकल्प हा उत्तूर विभागासह कडगाव-गिजवणे विभागाच्या हरितक्रांतीचा वरदायिनी आहे. या प्रकल्पाची पूर्तता माझ्या आयुष्यातील मोठा आनंद आहे, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रकल्प स्थळी भेट दिली असता केले.
मुश्रीफ म्हणाले, कै. बाबासाहेब कुपेकर यांनी या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती, ती पूर्ण करून मी धन्य झालो आहे. प्रकल्पामधून जाणारे पाणी अडवून उपसा करण्यासाठी सातपैकी सहा कोल्हापुरी बंधारे पूर्ण झाले आहेत. एका बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ज्यांच्या त्यागामुळे हा प्रकल्प साकारला, अशा शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यावर आहे. ऑगस्ट महिन्याअखेर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पाणी पूजनाचा कार्यक्रम होऊन या प्रकल्पाचे लोकार्पण होईल. तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, प्रांताधिकारी विजया पांगारकर, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, कार्यकारी अभियंता सौ. स्मिता माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, तत्कालीन अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर व अजित पवार, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, विशेष भूमी संपादन अधिकारी हेमंत निकम, कनिष्ठ सहाय्यक कृष्णा रेपे व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुनील पाटील, करण शिंदे, कुमार माने, मारुती चव्हाण, पाटबंधारे शाखा अभियंता कैतान बारदेस्कर, शाखा अभियंता नीलेश रानमाळे, उपअभियंता दिनेश खट्टे यांचे योगदान चांगले लाभले.
कार्यक्रमास कडगावचे जि. प. सदस्य सतीश पाटील, वसंतराव धुरे, परिषद सदस्य काशिनाथ तेली, प. स. सदस्य शिरीष देसाई, सुधीर देसाई, मारुतराव घोरपडे आदी उपस्थित होते. ठेकेदार संजय पाटील यांनी आभार मानले.
फोटो ओळी :-१ आंबेओहळ प्रकल्पामध्ये साठलेल्या पहिल्याच पाणीसाठ्याचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या मंत्री श्री. मुश्रीफ यांचे शेतकऱ्यांनी फुलांचा सडा अंथरूण असे जल्लोषी स्वागत केल (छाया : रवींद्र येसादे)
फोटो ओळी : २ आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथील प्रकल्प स्थळावर घळभरणीच्या ठिकाणी फुलांचा वर्षाव करताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, वसंत धुरे, जि. प. सदस्य सतीश पाटील, काशिनाथ तेली, संजय पाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, प्रकल्प अभियंता स्मिता माने. (छाया : रवींद्र येसादे)