माणगावेंकडून दिवसांत इंधन पुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 21:13 IST2019-08-14T21:12:04+5:302019-08-14T21:13:59+5:30
आपत्तीच्या काळात डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून काम करणारा व्यक्ती ती यशस्वी ठरते. अशाच पद्धतीने माणगावे गेली ३५ वर्षे पेट्रोल, डिझेल डीलर म्हणून जयसिंगपूर, शिरोळ परिसरांत कार्यरत आहेत

माणगावेंकडून दिवसांत इंधन पुरवठा सुरळीत
कोल्हापूर : गेल्या सहा दिवसांत शहरात पेट्रोल, डिझेलअभावी जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती, अशा परिस्थितीतही अगदी एका दिवसात जिल्ह्यातील काही भागांसह शहराचा इंधन पुरवठा सुरळीत झाला. याचे कारण म्हणजे गजकुमार माणगावे आणि जिल्हा पेट्रोल, डिझेल डीलर्स असोसिएशनच्या सदस्यांनी केलेली मदत मोलाची ठरली.
आपत्तीच्या काळात डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून काम करणारा व्यक्ती ती यशस्वी ठरते. अशाच पद्धतीने माणगावे गेली ३५ वर्षे पेट्रोल, डिझेल डीलर म्हणून जयसिंगपूर, शिरोळ परिसरांत कार्यरत आहेत. गेल्या सहा दिवसांतील महापुराच्या गंभीर परिस्थितीत शहरवासीयांचे दैनंदिन काम सुरळीत व्हावे, या माणुसकीच्या नात्याने माणगावे यांनी या रविवारी (दि. ११) सकाळी सहा ते सोमवारी (दि. १२) उशिरा रात्रीपर्यंत इंधन कंपन्या, प्रशासन, डीलर्स, पुणे विभागीय उपायुक्त, पुरवठा अधिकारी, तहसीलदार, माध्यमे, ग्राहकांशी सातत्याने समन्वय साधत त्यांनी शहरासह जिल्ह्याचा इंधन पुरवठा सुरळीत केला. यात टँकरचालक, इंधन कंपनीचे अधिकारी यांनी जीपीआरएसद्वारे मार्गदर्शन करीत पुराच्या पाण्यातूनही ही सेवा सुरळीत करण्यासाठी अपार कष्ट घेतले.