शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाने भरलेल्या ट्रँक्टरचे पुढचे चाक निखळले, सुदैवाने चालक बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 18:16 IST

कुंभी कासारी कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रँक्टरचे अचानक पुढचे चाक निखळले. सुदैवाने यात ट्रँक्टर चालकाला कोणतीही इजा झाली नाही.

कोपार्डे - कुंभी कासारी कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रँक्टरचे अचानक पुढचे चाक निखळले. यामुळे ट्रँक्टर व ऊसाने भरलेली ट्राँली रस्त्याला असणाऱ्या पदपथावर चढल्याने भर रस्त्यावर ऊसासह ट्रँक्टर - ट्राँली पलटी झाली. सुदैवाने यात ट्रँक्टर चालकाला कोणतीही इजा झाली नाही. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. अपघाता दरम्यान रस्त्यावर कोणतेही वाहन अथवा पादचारी नसल्याने मोठा अनर्थ टळला.याबाबत माहिती अशी की, बाळू बाबू गोठम (रा. तांदूळवाडी ता. पन्हाळा) यांच्या मालकीचा हा ट्रँक्टर आहे. ते  कुंभी कासारी कारखान्याकडे ट्रँक्टर (क्रमांक एम एच ०९ - ५७८३) ने तांदूळवाडीतून ऊस वाहतूक करतात. आज ऊसाने भरलेला ट्रँक्टर ट्रॉली घेवून कुंभी कासारी ते गगनबावडा रस्त्यावरून कारखान्याच्या कार्यस्थळावर गेस्टहाऊस जवळ आले असता अचानक ट्रँक्टरच्या पुढील चाकाचा स्पींडल तुटला.

यामुळे ट्रँक्टर ट्रॉलीसह रस्त्या लगत असणाऱ्या उंच फुटपाथवर चढला. यात ऊसाने भरलेली ट्रॉली रस्त्यावरच पलटी झाली. यावेळी मोठा आवाज झाल्याने लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.  यानंतर जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेला ऊस बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेAccidentअपघात