शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आता कोल्हापुरातून थेट आसाम, या रेल्वे सेवेमुळे पर्यटनाला मिळणार चालना; 'असे' आहे वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 12:36 IST

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या आणि गुवाहाटी येथील माता कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविक, पर्यटकांची या नव्या रेल्वेमुळे मोठी सोय होणार

कोल्हापूर : कोल्हापुरातून रेल्वेने थेट गुवाहाटी (आसाम) येथे जाता येणार आहे. रेल्वे विभागाकडून दि. १२ एप्रिलपासून कोल्हापूर - गुवाहाटी एक्स्प्रेसची सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. 

हॉलिडे स्पेशल म्हणून दि. ७ जूनपर्यंत कोल्हापूर - गुवाहाटी एक्स्प्रेसच्या नऊ फेऱ्या होणार आहेत. आठवड्यातील दर मंगळवारी कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी रेल्वे सुटणार आहे. त्यानंतर ती सकाळी सहा वाजता मिरजमधून गुवाहाटीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.ही रेल्वे शुक्रवारी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. त्यादिवशी सायंकाळी पावणेसहा वाजता निघणारी रेल्वे कोल्हापुरात सोमवारी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी पोहोचणार आहे. 

दरम्यान, सध्या कोल्हापूर - धनबाद मार्गावर दीक्षाभूमी एक्स्प्रेस धावत आहे. त्याच मार्गाने कोल्हापूर - गुवाहाटी रेल्वे पुढे जाणार आहे. त्यामुळे दीक्षाभूमी एक्स्प्रेसवर असणारा प्रवाशांचा भार कमी होणार असल्याचे श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचे प्रबंधक विजयकुमार यांनी शुक्रवारी सांगितले.याठिकाणी असणार थांबेकोल्हापूर - गुवाहाटी एक्स्प्रेसचे मिरज, लातूर रोड, पिंपळखुटी, जहारपुरा, इटारसी जंक्शन, मणिपूर जंक्शन, प्रयागराज (इलाहाबाद), दीनदयाळ उपाध्याय (मुघल सराई), गया, किऊल जंक्शन, मलदा टाऊन, जलपाईगुडी या स्थानकांवर थांबणार आहे.कोल्हापूर - कलबुर्गी एक्स्प्रेसही सुरू होणारकोल्हापूर - कलबुर्गी (कर्नाटक) एक्स्प्रेसही रेल्वे विभागाकडून सुरू करण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापुरातून पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूरकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे.

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या आणि गुवाहाटी येथील माता कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविक, पर्यटकांची या नव्या रेल्वेमुळे मोठी सोय होणार आहे. -शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती 

कोल्हापूरमधून आणखी एक लांब पल्ल्याची रेल्वे सुरू होत असल्याचा आनंद आहे. कोल्हापूर - गुवाहाटी, कोल्हापूर - कलबुर्गी एक्स्प्रेसमुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. -मोहन शेटे, रेल्वे प्रवासी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे