शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जेलमधील मित्र, सुटल्यावर बनावट नोटा खपविण्याचे सत्र; चौघांना बुधवारपर्यंत कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 18:04 IST

गडहिंग्लजमधील बनावट नोटा प्रकरणाचा १२ तासांत छडा

गडहिंग्लज : बहुराष्ट्रीय बँकेच्या येथील शाखेच्या ‘सीडीएम’ मशीनमध्ये भरण्यात आलेल्या बनावट नोटांचा गडहिंग्लज पोलिसांनी १२ तासात छडा लावला. त्यातून शिक्षा भोगून आलेल्या बेळगाव जिल्ह्यातील ‘जेल’मधील मित्रांनी संगनमताने बनावट नोटा खपवण्याचा धंदा सुरू केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी अटकेतील चौघांनाही येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी बुधवारपर्यंत (२५ जून) पोलिस कोठडी दिली आहे.आकाश रवींद्र रिंगणे (वय २८, नदीवेस खोत गल्ली, गडहिंग्लज), नितीन भैरू कुंभार (वय ३३, कुंभार गल्ली, गडहिंग्लज), अशोक महादेव कुंभार (वय ५४, प्रभुवाडी गल्ली चिक्कोडी), दिलीप सिद्धाप्पा पाटील (वय ४३, बिद्रेवाडी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) अशी आरोपींची नावे आहेत.अधिक माहिती अशी, येथील भडगाव रोडवर संबंधित बँकेची शाखा असून बँकेच्या प्रवेशद्वारासमोरच ग्राहकांच्या सोयीकरिता एटीएम-सीडीएम मशीन बसवण्यात आले आहे.मंगळवारी (१७) मध्यरात्री आकाशने सीडीएमद्वारे आपल्या खात्यावर १७,५०० रुपये भरले होते. मात्र, त्याने भरलेल्या ५०० रुपयांच्या ३५ नोटा बनावट असल्याचे ‘सीएसएम’ कंपनीच्या कर्मचा-यांना निदर्शनास आले. नोटांच्या पडताळणीअंती उपशाखाधिकारी गौरव खरबुडे यांनी पोलिसात बँकेच्या फसवणुकीची फिर्यादी दिली आहे.

अशी झाली कारवाईपोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी फिर्याद दाखल होताच संशयित आकाशला तातडीने ताब्यात घेतले. त्याने त्या नोटा नितीनकडून घेतल्याचे व नोटा मशीनमध्ये भरताना तोही सोबत असल्याचे सांगितले. नितीनने अशोकडून दिलीपमार्फत २० हजाराच्या बनावट नोटा घेतल्याचे सांगितले. एकमेकांचे नातेवाईक असणा-या नितीन व अशोकलाही ताब्यात घेण्यात आले. चौकशीत चौघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे.

तीन वर्षातील दुसरा गुन्हा२७ ऑगस्ट २०२२ रोजी गडहिंग्लज पोलिसांनी ५ रस्ता महागाव येथे सापळा रचून १,८८,६०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्या नोटा देण्यासाठी आलेल्या बेळगावच्या एकासह महागावातील चौघांना अटक झाली होती. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे.

शिक्षा भोगून बाहेर..पुन्हा धंदा सुरू!यापूर्वी आरोपी अशोकला बनावट नोटाप्रकरणी ६ वर्षांची शिक्षा झाली असून दिलीपला अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. जेलमध्ये असतानाच दोघांची मैत्री झाली असून त्यांनी संगनमताने पुन्हा बनावट नोटा खपवण्याचा धंदा सुरू केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

बनावट नोटा येतात कुठून?सीमाभागात बनावट नोटा चलनात आणणारी आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचे तपासातून पुढे आले आहे. बनावट २० हजारपैकी उर्वरित अडीच हजारांच्या नोटा जप्त करण्याबरोबरच बनावट नोटा कुठून येतात? याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.