शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

सर्किट बेंचबाबत शुक्रवारची डेडलाईन, मुख्य न्यायाधीशांची उद्या बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 15:43 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग यांची प्रशासकीय बैठक उद्या, बुधवारी होत आहे. त्यानंतर बैठकीत काय ठरले, यासंदर्भातील निर्णय ते शुक्रवारी (दि. २ आॅगस्ट) सांगणार आहेत. त्या निर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे, अशी माहिती खंडपीठ कृ ती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. रणजित गावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्देनिर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविणारकृती समिती निमंत्रक अ‍ॅड. रणजित गावडे यांची माहिती

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग यांची प्रशासकीय बैठक उद्या, बुधवारी होत आहे. त्यानंतर बैठकीत काय ठरले, यासंदर्भातील निर्णय ते शुक्रवारी (दि. २ आॅगस्ट) सांगणार आहेत. त्या निर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे, अशी माहिती खंडपीठ कृ ती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. रणजित गावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा प्रश्न गेली काही वर्षे ऐरणीवर आला असून, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यांंतील वकिलांनी या प्रश्नासंबंधी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी घ्यावयाचा असून, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रश्नासंबंधी खंडपीठ कृती समितीने २० जुलैला मुख्य न्यायाधीशांची भेट घेतली.

यावेळी कृती समिती निमंत्रक अ‍ॅड. रणजित गावडे यांनी तत्कालीन मुख्य न्यायाधीशांसमोर सर्किट बेंच संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव सादर केला आहे. शासनाने जागेसह निधीची उपलब्धता करून देण्याचेही लेखी पत्र दिले आहे. आपण तत्काळ मंजुरी द्यावी, अशी विनंती केली. त्यावर न्यायाधीश नंद्रजोग यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेसंदर्भातील अभ्यास मी केला आहे. त्याचा आढावा घेतला आहे. त्यासाठी मी सकारात्मक असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असा विश्वास कृती समितीला दिला होता.

कृती समितीने २४ जुलै आंदोलनाची डेडलाईन ठेवली होती; परंतु न्यायाधीश नंद्रजोग यांनी उद्या, बुधवारी सर्किट बेंचबाबत प्रशासकीय बैठक घेऊन त्यामध्ये होणारा निर्णय आपणाला शुक्रवारी (दि. २ आॅगस्ट) कळविला जाईल, असे सांगितले आहे. हा निर्णय काय आहे, याची उत्सुकता लागून राहिली आहे. सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा आहे. तो नाही झाला तर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल, असे अ‍ॅड. गावडे यांनी सांगितले.निमंत्रण की बेंचचा निर्णयकोल्हापुरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या वकील प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाचे निमंत्रण मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग यांना दिले आहे. या निमंत्रणासंबंधीची तारीख कळवितात की, सर्किट बेंचबाबतचा निर्णय हे २ आॅगस्टलाच कळणार आहे.

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर