शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

जवानांसाठी मोफत प्रवासाची सोय : दुग्गूनवाडीच्या मंगेशची अशीही देशभक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 11:40 AM

IndianArmy, Kolhapurnews स्वत: सैनिक नाही अन् नातेवाईकांमध्येही कोणी सैनिक नाही. मात्र, सीमेवर निधड्या छातीने शत्रूशी दोन हात करणाऱ्या व अहोरात्र डोळ्यात तेल घालून देशसेवा बजावणाºया सैनिकांच्या आदरापोटी दुग्गूनवाडीच्या मंगेश सुतार यांनी खास सैनिकांसाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे सैनिक व देशप्रेमीतून कौतुक होत आहे.

ठळक मुद्देजवानांसाठी मोफत प्रवासाची सोय : दुग्गूनवाडीच्या मंगेशची अशीही देशभक्तीसैनिकांतूनही उपक्रमाचे स्वागत

शिवानंद पाटील 

गडहिंग्लज :  स्वत: सैनिक नाही अन् नातेवाईकांमध्येही कोणी सैनिक नाही. मात्र, सीमेवर निधड्या छातीने शत्रूशी दोन हात करणाऱ्या व अहोरात्र डोळ्यात तेल घालून देशसेवा बजावणाऱ्या सैनिकांच्या आदरापोटी दुग्गूनवाडीच्या मंगेश सुतार यांनी खास सैनिकांसाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे सैनिक व देशप्रेमीतून कौतुक होत आहे.दुग्गूनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील मंगेश जाधव यांनी जवानांना अभिमामाने घरापासून ते रेल्वेस्टेशन, विमानतळ किंवा बसस्थानकापर्यंत स्पेशल गाडीने सोडण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. स्वत: सुतार व त्यांचे मित्र अनुपम चिकरे हे सैनिकांना इच्छित ठिकाणापर्यंत सोडण्याचे काम करत आहेत. त्याबदल्यात ते कोणताही मोबदला घेत नाहीत. केवळ संबंधित सैनिकांनी बळजबरीने कांही दिले तरच ते स्विकारतात.एखादा जवान शहीद झाल्यानंतर त्याचे पार्थिव घरी येवून अंत्यविधी होईपर्यंत गावकऱ्यांसह सीमाभागातील अनेकजण शहीद जवानांच्या कुटुंबियांना धीर देतात. मात्र, एखादा जवान सुट्टीवर गावी येताना किंवा पुन्हा सुट्टी संपवून देशसेवेसाठी जाताना त्यांना धीर देण्यासाठी कुटुंबीय सोडून कोणीही नसतात.

स्वत:ची व कुटुंबियांची काळजी न करता देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकांच्या ऋणातून उतराई होण्यासाठीच हा उपक्रम सुरू केला आहे. सुट्टी संपवून पुन्हा सीमेवर जाणाऱ्या अनेक जवानांना सोडण्यासाठी जात असताना त्यांच्या व्यथा ऐकून क्षणभर त्यांच्याबद्दल अभिमानही वाटतो अन् मनही भरून येते.- मंगेश सुतार, दुग्गूनवाडी, ता. गडहिंग्लज.

 ८ दिवसात ११ जणांना सेवामुंबई येथील २६/११ च्या हल्यातील शहीदांना आदरांजली वाहून मंगेश यांनी या सेवेचा प्रारंभ केला. त्यांनी ८ दिवसात गडहिंग्लज, शिप्पूर, बुगड्डीकट्टी, हसूरसासगिरी, निपाणी, नेसरी, लिंगनूर येथील ११ जवानांना बेळगाव व कोल्हापूरच्या विमानतळ व रेल्वेस्थानकापर्यंत सेवा दिली आहे.

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानkolhapurकोल्हापूर