शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

कोरगांवकर ट्रस्टमार्फत दहा हजार रोपांचे विनामूल्य वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 1:54 PM

Envoirnement Kolhapur : वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नैसर्गिक समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत या भावनेतून कोल्हापूरातील कोरगांवकर ट्रस्ट आणि शिरोली येथील कोरगांवकर पेट्रोलपंप यांच्यामार्फत सुमारे दहा हजार रोपांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. एचपीसीएलचे विभागीय सरव्यवस्थापक फाल्गुनी हलदार यांच्या हस्ते या वृक्षांच्या रोपांचे वाटप झाले.

ठळक मुद्देकोरगांवकर ट्रस्टमार्फत दहा हजार रोपांचे विनामूल्य वितरणएचपीसीएलचे विभागीय सरव्यवस्थापक फाल्गुनी हलदार यांच्या हस्ते वाटप

कोल्हापूर : वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नैसर्गिक समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत या भावनेतून कोल्हापूरातील कोरगांवकर ट्रस्ट आणि शिरोली येथील कोरगांवकर पेट्रोलपंप यांच्यामार्फत सुमारे दहा हजार रोपांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. एचपीसीएलचे विभागीय सरव्यवस्थापक फाल्गुनी हलदार यांच्या हस्ते या वृक्षांच्या रोपांचे वाटप झाले.सामाजिक जाणीव आणि पर्यावरण जपणूकीचे भान ठेवून गेल्या काही वर्षापासून कोल्हापुरातील कोरगावकर ट्रस्टमार्फत या औषधी वृक्षांची मोफत रोपटी लागवडीसाठी वाटप केली जातात. याही वर्षी सुमारे दहा हजार रोपट्यांचे वाटप करण्यात आले. याबरोबर ट्रस्टच्या वतीने कोरगावकर पेट्रोल पंप येथे मोफत अन्नछत्राचाही हजारो गरजूंना लाभ मिळत आहे.कोरोनाच्या काळात प्रामुख्याने जाणवलेली ऑक्सिजनची गरज आणि त्याचबरोबर औषधी वनस्पतींची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती ट्रस्टचे राज कोरगांवकर यांनी दिली. या विनामूल्य वृक्ष रोप वाटप कार्यक्रमाप्रसंगी हलदार यांनी झाडे केवळ न लावता ती जगवली पाहिजेत असे आवाहन केले तसेच संकटकाळात गरीबांची भुक भागवणारा अन्नछत्राचा उपक्रमही कौतुकास्पद असल्याचे हलदार यांनी सांगितले.यावेळी एच.पी.सी.एलचे जनरल मॅनेजर ध्रुव कपिल, कोरगावकर ट्रस्टचे अमोल कोरगावकर,आशिष कोरगावकर, राज कोरगावकर, आकाश कोरगावकर, अनिकेत कोरगावकर, ओम कोरगावकर आदिंसह शिरोली येथील कोरगावकर पेट्रोल पंप येथील कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर