शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

नोकरीचे खोटे अपॉईंटमेंट लेटर, नऊ लाख रुपयांची फसवणूक, भाचीसह मामा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:42 IST

सीआयडी विभागात फौजदार असल्याचे भासवून सीआयडी पोलिस खात्यात नोकरीला लावतो, अशी बतावणी करून तिघा जणांना नऊ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया सीआयडी फौजदार युवतीला व तिच्या मामाला भुदरगड पोलिसांनी गजाआड केले.

ठळक मुद्देनोकरीचे खोटे अपॉईंटमेंट लेटरनऊ लाख रुपयांची फसवणूक, भाचीसह मामा गजाआड

गारगोटी : सीआयडी विभागात फौजदार असल्याचे भासवून सीआयडी पोलिस खात्यात नोकरीला लावतो, अशी बतावणी करून तिघा जणांना नऊ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया सीआयडी फौजदार युवतीला व तिच्या मामाला भुदरगड पोलिसांनी गजाआड केले.

या दोघांनी मिळून भुदरगड तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक युवक-युवतींना लाखो रुपयांचा गंडा घातला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रियांका प्रकाश चव्हाण (वय २२, गारगोटी,गुलमोहर कॉलनी,शिंदे चौक) व तिचा मामा विठ्ठल मारूती निलवर्ण (वय-३८, रा. निळपण,ता भुदरगड) अशी त्यांची नावे आहेत.

या प्रकरणी प्रतीक्षा प्रकाश साळवी हिने भुदरगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकाराने भुदरगड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.गारगोटी येथील प्रियांका चव्हाण हिने निळपण येथील प्रतीक्षा प्रकाश साळवी, प्रज्ञा प्रमोद मेंगाने, मंगेश आनंदा चौगले या तिघांना तिचा मामा विठ्ठल निलवर्ण यांच्या मध्यस्थीने सीआयडी मध्ये नोकरीला लावतो असे सांगून प्रतीक्षा कडून २७ जुलै पासून रविवारी दि २ ऑगस्ट पर्यंत ५ लाख २५ हजार, प्रज्ञा मेंगाने कडून १लाख ५०हजार , मंगेश चौगलेकडून २ लाख ५० हजार असे नऊ लाख २५ हजार रुपये घेतले होते.

या सर्वांची दहावी,बारावी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला अशी कागदपत्रे घेऊन प्रतीक्षा हिला सीआयडी कॉन्स्टेबल, तर प्रज्ञा हिला अव्वल कारकून म्हणून अपॉइंटमेंट लेटर आणि बनावट ओळखपत्र दिले. हे पत्र कोणाला दाखवू नये म्हणून तिने सांगितले, हे पत्र जर कोणाला दाखवले किंवा सांगितले तर तुमच्या नोकरीवर पाणी पडू शकते, तुमच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो, मग आयुष्यात कधीही नोकरी लागणार नाही.

 तिच्या सांगण्याने सगळी गप्प होती पण नकळत प्रतिक्षाच्या भावाने हे पत्र व्हाट्सअप्पच्या स्टेट्सला ठेवले. हे पत्र पोलिसांनी पाहिल्यावर त्याला बोलावून घेतले आणि चौकशी केली असता खरा प्रकार बाहेर पडला.२०१७ साली प्रियांका हिने आपण सीआयडी इन्स्पेक्टर झाल्याची खोटी बतावणी करून गारगोटी शहरात पोस्टर झळकावली होती. या माध्यमातून तिने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून घेऊन आपली सीआयडी फौजदार अशी इमेज तयार करून घेतली. तिच्या या भुलथापावर लोकांचाही विश्‍वास बसला.

या माध्यमातून तिने अनेक बेरोजगार युवक-युवतींना हेरून सीआयडी विभागात नोकरी लावतो, असे सांगून प्रियांका व तिच्या मामांनी लाखो रूपये जमा केले. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक काशीद यांनी या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची दिवसभर कसून चौकशी करण्यात येत होती. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन मार्गदर्शन करीत आहेत.अगदी हुबेहूब बनावट हजरपत्र आणि ओळखपत्र

अगदी हुबेहूब बनावट हजरपत्र आणि ओळखपत्र तयार करून ते लिंकद्वारे संबंधित बेरोजगार युवक अथवा युवतीला दिले जाते. हे ओळखपत्र कोणी तयार केले ? ही लिंक कोणी तयार केली ? याचा तपास होणे आवश्यक आहे.

एवढं धाडस कोठून आले ?

गल्लीत इतरांच्यासोबत पोलिसी भाषेत बोलत असते. स्वतः कोठेही नोकरीला नसताना अंगावर पोलिस अधिकाऱ्याची वर्दी, गावभागात पोस्टरबाजी, मान्यवरांच्या हस्ते हजारो लोकांच्या उपस्थितीत सत्कार करून घेणे, गोरगरीब बेरोजगार युवक आणि युवतींची लाखो रुपयांची फसवणूक करणे ! एवढे धाडस गरीब घरात जन्मलेल्या प्रियांका हिच्यात कोठून आले याची चर्चा होत आहे. 

लाखो रुपयांची माया जमवली 

या सगळ्या लबाडीतून गारगोटी येथे ४१ लाखांचे रो हाऊस, ५० तोळे सोने, एक चारचाकी, दुचाकी अशी लाखो रुपयांची माया जमवल्याची चर्चा सुरू होती. पोलिसांनी या रो हाऊस विक्रेत्याला चौकशीसाठी बोलावून घेतले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर