शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दामदुप्पटच्या नावाखाली फसवणूक: ए. एस. ट्रेडर्समधील कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक कॅसिनोत, संचालकाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 12:54 IST

ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एल. एल. पी. कंपनीचे कारनामे आता हळूहळू बाहेर येऊ लागले

कोल्हापूर : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूदारांकडून घेतलेले कोट्यवधी रुपये देश-विदेशातील कॅसिनोत गुंतवल्याचा धक्कादायक खुलासा कंपनीचा संचालक अमर विश्वास चौगले (रा. गडहिंग्लज) याने एका व्हिडीओतून केला आहे. कॅसिनो म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे, त्यामुळे कंपनीने कॅसिनोत गुंतवलेले पैसे परत मिळतील की नाही, या चिंतेने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून कार्यालये बंद ठेवलेल्या ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एल. एल. पी. कंपनीचे कारनामे आता हळूहळू बाहेर येऊ लागले आहेत. गुंतवणूकदारांचा पैसा शेअर बाजारात गुंतवून त्यातून भरघोस परतावा मिळवत असल्याचे कंपनीच्या संचालकांकडून आणि एजंटकडून सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र कंपनीचा बराच पैसा शेअर बाजारात नाही, तर चक्क कॅसिनोत गुंतवल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीचा संचालक अमर चौगले यानेच एका व्हिडीओतून ही माहिती जाहीर केली.भारतासह नेपाळ, श्रीलंका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमधील कॅशिनोशी ए. एस. ट्रेडर्स कंपनीने करार केले आहेत. गुंतवलेल्या पैशातून कंपनीला आणि गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळणार आहे. गुंतवणूकदार स्वत: कॅसिनोमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन खेळू शकतात. त्यासाठी ए. एस. टोकनचा वापर करू शकता, अशी माहिती खुद्द कंपनीचा संचालक चौगले यानेच दिली आहे. कॅसिनोत गुंतवणूक करणे ही गुंतवणूकदारांची फसवणूक असल्याचा आरोप ए. एस. ट्रेडर्स विरोधी कृती समितीने केला. कॅसिनो म्हणजे जुगारचकॅसिनोमधून पैसे कमवल्याचे एकही उदाहरण आपल्या आसपास दिसत नाही. कॅसिनो हा एक प्रकारचा जुगारच आहे. याच्या नादी लागून अनेकांना आपले घर-दार विकावे लागले. ए. एस. ट्रेडर्स कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे कॅसिनोत लावून जुगार खेळल्याचा आरोप विरोधी कृती समितीने केला आहे.

गुंतवणूकदार अस्वस्थए. एस. ट्रेडर्सच्या तपासात पोलिसांकडून विशेष गती नाही. संचालक आणि एजंटचे मोबाईल बंद आहेत. ११ नोव्हेंबरला ऑनलाईन मीटिंग होणार असल्याचा एक मेसेज गुंतवणूकदारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल होत आहे. मात्र, ही मीटिंग होईल की नाही त्याबद्दल खात्री नाही, तर कंपनीची कार्यालये अजून बंदच असल्याने गुंतवणूकदारांची अस्वस्थता वाढली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस