शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

बावड्याच्या नागरी वस्तीत कोल्ह्याची दहशत, गोठ्यातील रेडकाला केले रक्तबंबाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 20:55 IST

Kolhapur: कसबा बावडा शहरात यापूर्वी  बिबट्याने येऊन धुमाकूळ घातलेला किंवा गव्यांच्या कळपाने येऊन दहशत निर्माण केल्याचे  प्रकार  अनेकदा घडले आहेत. पण आता याच्या जोडीला  कोल्ह्यानेही दहशत माजवायला सुरुवात केली आहे.

कसबा बावडा - शहरात यापूर्वी  बिबट्याने येऊन धुमाकूळ घातलेला किंवा गव्यांच्या कळपाने येऊन दहशत निर्माण केल्याचे  प्रकार  अनेकदा घडले आहेत. पण आता याच्या जोडीला  कोल्ह्यानेही दहशत माजवायला सुरुवात केली आहे. मंगळवारी दुपारी बावड्याच्या नागरी वस्तीत आणि गल्ल्यांमधून पूर्ण वाढ झालेल्या कोल्ह्याने फेरफटका मारून चांगलीच दहशत दाखवली. या कोल्ह्याने गोठ्यात बांधलेल्या रेडकाच्या तोंडाचा कडकडून चावा घेऊन त्याला रक्तबंबाळ केलेच शिवाय गल्लीतून सैरावैरा पळत त्याने दहशती माजवली. त्यामुळे नागरिकात मोठी घबराट निर्माण झाली. दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

बावड्यात कोल्हा आल्याचे समजताच परिसरातील बावडा रेस्क्यू फोर्सच्या तरुणांनी त्याला पकडण्यासाठी पाठलाग केला.  याच दरम्यान बिथरलेल्या कोल्ह्याने पिंजार गल्ली येथील संतोष तवार यांच्या परसदारातील बांधलेल्या रेडकाच्या तोंडाचा चावा घेवून पळ काढला.  दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या कोल्ह्याने सर्वांना हुलकावणी दिली आणि तो गायब झाला.  सोशल मीडियावर याबाबत माहिती येताच दुपारपासून बावड्यात  कोल्ह्याची चर्चा सुरू झाली.

येथील वाडकर गल्लीमध्ये हा कोल्हा सर्वप्रथम नागरिकांच्या निदर्शनास आला. गल्लीतील तरुणानी  दुचाकीवरून त्याचा पाठलाग केला. तसेच या बाबत बावडा रेस्क्यू फोर्सच्या  माहिती दिली आणि कोल्ह्याला पकडण्यासाठी बावडा रेस्क्यू फोर्सचे कार्यकर्ते हजर झाले. या कार्यकर्त्यांनी त्याचा वाडकर गल्लीपासून मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता सदर कोल्हा आंबेडकर उद्यान मार्गे ओम गल्ली येथून संकपाळनगर पर्यंत दिसून आला.  त्यानंतर तो गोळीबार मैदान परिसरात गायब झाला.  या घटनेमुळे  अनेकांनी आपल्या लहान मुलांना यावेळी घराबाहेर जाण्यापासून रोखले.

बावडा रेस्क्यू फोर्सचे विनायक आळवेकर, प्रदीप उलपे, मुकेश शिंदे, मानसिंग जाधव, नितीन माने, सुनील पाटील, निशिकांत कांबळे, रुपेश पाटील, अक्षय निकम, इम्रान इनामदार आदींनी त्याला पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला.  वन्यजीव पथकाचे सदस्य आशुतोष सूर्यवंशी व ओंकार काटकर यांनी यानंतर चावा घेतलेल्या रेडकाची पाहणी करून खात्री केली. 

उसाच्या फडात कोल्ह्यांचा वावर...कसबा बावड्यातील नदीकाठच्या उसाच्या फड्यात कोल्ह्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. सध्या गळीत हंगाम सुरू झाल्याने उसाची शिवारं मोकळी होऊ लागली आहेत. त्यामुळे बितरलेला कोल्हा नागरी वस्तीत आल्याची शक्यता वर्तवली जात आहे

English
हिंदी सारांश
Web Title : Fox Terrorizes Kasba Bawda, Attacks Calf; Residents Fearful

Web Summary : A fox created panic in Kasba Bawda, Kolhapur, attacking a calf and causing fear among residents. Rescue efforts proved unsuccessful as the fox roamed through residential areas before disappearing into nearby fields. Locals are on alert.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरwildlifeवन्यजीव