कोल्हापुरातून धावणाऱ्या चार रेल्वे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:25 IST2021-05-08T04:25:23+5:302021-05-08T04:25:23+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमध्ये सध्या कोल्हापुरातून धावणाऱ्या तिरूपती, महाराष्ट्र एक्स्प्रेससह चार रेल्वेची सेवा सुरू आहे. मात्र, प्रवासी संख्या ...

कोल्हापुरातून धावणाऱ्या चार रेल्वे सुरू
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमध्ये सध्या कोल्हापुरातून धावणाऱ्या तिरूपती, महाराष्ट्र एक्स्प्रेससह चार रेल्वेची सेवा सुरू आहे. मात्र, प्रवासी संख्या कमी आहे. आठवड्यातून दोन दिवस कोल्हापूर-नागपूर मार्गावर धावणारी नागपूर एक्स्प्रेस दि. २८ जूनपर्यंत मध्य रेल्वेकडून रद्द करण्यात आली आहे.
आठवड्यातील दर सोमवारी आणि शुक्रवारी पंढरपूरमार्गे नागपूर एक्स्प्रेस धावते. कोरोनामुळे मध्य रेल्वेने नागपूर एक्स्प्रेस दि. २८ जूनपर्यंत रद्द केली आहे. कोल्हापूर-मुंबई मार्गावरील महालक्ष्मी एक्स्प्रेस दि. ३० जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर-नागपूर मार्गावर रोज धावणारी महाराष्ट्र (गोंदिया) एक्स्प्रेस सुरू आहे. कोल्हापूर-तिरूपती, कोल्हापूर-मुंबई मार्गावरील कोयना एक्स्प्रेस, कोल्हापूर-धनबाद मार्गावरील दीक्षाभूमी एक्स्प्रेस नियमित वेळेनुसार धावणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. कोरोना आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे प्रवासी संख्या कमी झाली असल्याची माहिती श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचे प्रमुख ए. आय. फर्नांडिस यांनी शुक्रवारी दिली.