वीर सैनिकांना चार महिन्यात मिळणार जमिन: जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 04:30 PM2019-12-07T16:30:42+5:302019-12-07T16:38:39+5:30

वीर सैनिक, वीर माता यांचे जमीन मागणीचे प्रलंबित प्रस्ताव मार्चपर्यंत मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी येथे दिली. ध्वजदिन निधी संकलनात कोल्हापूर नेहमीच अग्रेसर राहीला आहे. यंदाच्या वषीर्ही आपण उद्दिष्ट पूर्ण करुन २ कोटीच्या पुढे नेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 Four soldiers will get land in four months: Collector | वीर सैनिकांना चार महिन्यात मिळणार जमिन: जिल्हाधिकारी

वीर सैनिकांना चार महिन्यात मिळणार जमिन: जिल्हाधिकारी

Next
ठळक मुद्देध्वजदिन निधी संकलन कार्यक्रम ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दीष्ट २ कोटीच्या पुढे नेऊ

कोल्हापूर : वीर सैनिक, वीर माता यांचे जमीन मागणीचे प्रलंबित प्रस्ताव मार्चपर्यंत मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी येथे दिली. ध्वजदिन निधी संकलनात कोल्हापूर नेहमीच अग्रेसर राहीला आहे. यंदाच्या वषीर्ही आपण उद्दिष्ट पूर्ण करुन २ कोटीच्या पुढे नेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉल येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने, निवृत्त ब्रिगेडीयर विजय घोरपडे, निवृत्त कर्नल अमरसिह सावंत, निवृत्त कर्नल विलास सुळकुडे, निवृत्त कर्नल बी.डी. कुलकर्णी आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांच्या मुलांचा तसेच ध्वजनिधी संकलनात उत्कृष्ट काम करणा?्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. वीर माता-पित्यांचा आदरपूर्वक जागेवर जावून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर माजी सैनिक त्यांचे नातेवाईक यांना मदतीचे धनादेश देण्यात आले.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्ह्यातील माणसे मदत करणारी आहेत. संकट कुणावरही येवो ती धडाडीने मदतीसाठी पुढे येतात. याची प्रचिती महापुराच्या वेळी घेतली आहे. नागरिकांच्या मदत कायार्मुळे महापुरासारख्या संकटातून जिल्हा सावरला. यामध्ये माजी सैनिकदेखील कार्यामध्ये पुढे होते.

डॉ. कलशेट्टी म्हणाले, देश रक्षणात सैनिक सदैव तत्पर असतात. त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी, कल्याणासाठी आपणही आघाडीवर असलं पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात ध्वजनिधीसाठी मदत करावी.
सुभाष सासने म्हणाले, ध्वजनिधी संकलनामधून माजी सैनिकांच्या कुटुंबाचे कल्याण पुनर्वसनासाठी मदत केली जाते. गतवर्षी १ कोटी ६० लाख निधीचे उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केले आहे.

यावर्षीही १ कोटी ६१ लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करून जिल्ह्यामधील दुसऱ्या महायुध्दातील ४६८ वीरपत्नींना १ कोटी ९८ लाखाची मदत करण्यात आली आहे. विविध ५० योजना राबविण्यात येत असून त्यासाठी १ कोटी ५१ लाखांची मदत देण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, घरबांधणी आदींचा समावेश आहे. निवृत्त कर्नल सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. वेदा सोनले यांनी स्मृतीगीत सादर केले. पूजा रेंगाळे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर पांगे यांनी आभार मानले.
 

 

Web Title:  Four soldiers will get land in four months: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.