सदाशिव मोरेआजरा : आजरा गडहिंग्लज तालुक्याला सुजलाम सुफलाम करणारा चित्री मध्यम प्रकल्प आज, मंगळवारी पूर्ण क्षमतेने भरला. तर, तालुक्यातील एरंडोळ, धनगरवाडी, खानापूर हे लघुपाटबंधारे तलाव यापूर्वीच तुडुंब झाले आहेत. चित्रीमुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.चित्रीच्या विद्युतगृहातून १८० तर सांडव्यातून ११० क्युसेक्सने पाणी नदीपात्रात येत असल्याने हिरण्यकेशी नदी धोक्याच्या पातळीबाहेरून वाहत आहे. चित्रीच्या पाण्यावर दररोज २ मेगावॅट विद्युत निर्मिती सुरू आहे. चित्री धरण परिसरासह तालुक्यात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. चित्री आंबेओहोळ या मध्यम प्रकल्पांबरोबर एरंडोळ, धनगरवाडी व खानापूर लघुपाटबंधारे प्रकल्पही भरले आहेत. उचंगी धरणात ७२ टक्के तर चिकोत्रा धरणात ९० टक्के पाणीसाठा झाला आहे.किटवडे परिसरात १९० मिलिमीटर पाऊसप्रतिचेरापुंजी असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात १९० मि.मी. पाऊस झाला आहे. २०२१ मध्ये ९ ऑगस्टपर्यंत ५७०९ तर २०२२ मध्ये ३३५२ मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २३५७ मि.मी.पाऊस कमी आहे.
कोल्हापूर: आजरा तालुक्यातील चित्रीसह चार प्रकल्प तुडुंब, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 19:02 IST