कोल्हापूर जिल्ह्यात महिन्याला चार रुग्णांना स्वरयंत्राचा कर्करोग, 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष 

By संदीप आडनाईक | Updated: February 6, 2025 19:46 IST2025-02-06T19:45:58+5:302025-02-06T19:46:21+5:30

धोका कोणाला?

four patients a month have cancer of the larynx In Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात महिन्याला चार रुग्णांना स्वरयंत्राचा कर्करोग, 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष 

कोल्हापूर जिल्ह्यात महिन्याला चार रुग्णांना स्वरयंत्राचा कर्करोग, 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष 

संदीप आडनाईक

कोल्हापूर : सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत माणूस अनेक गोष्टींच्या आहारी जात आहे. ही जीवनपद्धत अनेक रोगांना आमंत्रित करते. त्यात कर्करोगाचे वाढते प्रमाण त्याचाच एक भाग असू शकतो. शरीरातील पेशींच्या अनियंत्रित आणि अनैसर्गिक वाढीमुळे होतो. स्वरयंत्राचा कर्करोग हा त्यातीलच एक प्रकार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी प्रत्येक महिन्यात सरासरी चार रुग्ण हे स्वरयंत्र कर्करोगाचे असल्याचे आढळले आहे.

स्वरयंत्रावर जास्तीचा ताण नको

शासकीय रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार धूम्रपान, मद्यपान, तंबाखू, अतिसेवन, अनुवंशिकता, पेट्रोलियम, अझबेसटोसिस या रसायनाशी संबंधित असलेल्या लोकांमध्ये स्वरयंत्राचा कर्करोग जास्त प्रमाणात आढळून येताे.

या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

सामान्यत: कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वजन कमी होणे, थकवा येणे, अचानक गाठ किंवा बरा न होणारा व्रण, अस्पष्ट वेदना, स्तनामध्ये गाठ, भूक न लागणे, अचानक रक्तस्त्राव होणे, अशी लक्षणे आढळतात. स्वरयंत्राच्या कर्करोगामध्ये घशामध्ये चुरचुरणे, खवखव होणे, थुंकीमध्ये रक्त येणे, गिळताना अन्न अडकणे, आवाजात बदल जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास घेताना आवाज होणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असा डॉक्टरांचा सल्ला आहे. हा रोग शरीरात पसरल्यास अन्ननलिकेला बाधा होऊन गिळण्यास त्रास होऊ शकतो.

धोका कोणाला?

धूम्रपान, मद्यपान, तंबाखू सेवन, बदलती आहारपद्धती, दूषित हवा, औद्योगिक प्रदूषण ही सामान्य कर्करोगाची कारणे आहेत. स्वरयंत्राच्या कर्करोगाचे व्यसनाधीन आणि मद्यपी लोकांमध्ये प्रमाण १५ टक्के आढळले आहे. या रोगाचा धोका पुरुषांमध्ये जास्त आढळतो. वय वर्षे ४० ते ६० या वयोगटात याचे प्रमाण अधिक आहे. जगभरात स्वरयंत्राच्या कर्करोगाची १,७७,४२२ नवीन प्रकरणे आढळली असून, ९४,७७१ (१.०%) लोकांचा मृत्यू या कर्करोगामुळे झाला आहे.

कर्करोगाचे प्रकार - प्रमाण (प्रतिलाखात) - मृत्यूचे प्रमाण
मुख  -  २६.३  -  ८.७
स्तन  -  ७७.९  - १०.७
गर्भाशय -  ५०.२  -  ८.७
स्वरयंत्र  -  १.०  -  १.०

सामान्य कर्करोगांमध्ये रक्तचाचण्या, बायोप्सी, इमेजिंग चाचण्या कराव्यात. केरोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया ही उपचार पद्धती आहे. सुप्राग्लॉटिस, ग्लॉटिस आणि सबग्लॉटिसचा कर्करोग असेल, तर त्वरित कान, नाक, घसा तज्ज्ञांकडून दुर्बिणीद्वारे स्वरयंत्रांची तपासणी करणे, जोडीला सीटी स्कॅन आणि एजेएसी करणे गरजेचे आहे. - प्रा. डॉ. अजित लोकरे, विभागप्रमुख, कान, नाक, घसा विभाग, सीपीआर, कोल्हापूर.

Web Title: four patients a month have cancer of the larynx In Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.