पन्हाळगडावर बारा पॉझिटिव्हपैकी चार रुग्ण परतले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 16:52 IST2020-08-08T16:51:19+5:302020-08-08T16:52:40+5:30
कोरोना संसर्ग झाल्यामुळे आत्तापर्यंत पन्हाळगडावर एकूण बारा पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते, पैकी चार रुग्ण आज घरी परतले.

पन्हाळा जकात नाक्यावर कोरोना निगेटिव्ह महिलेचे स्वागत मुख्याधिकारी कैलास चव्हाण, नगरपरिषद कर्मचारी यांनी केले.
पन्हाळा - कोरोना संसर्ग झाल्यामुळे आत्तापर्यंत पन्हाळगडावर एकूण बारा पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते, पैकी चार रुग्ण आज घरी परतले.
पन्हाळा नाक्यावर मुख्याधिकारी कैलास चव्हाण, नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी या रुग्णांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. या बारा पॉझिटिव्ह रुग्णांच्या पहील्या संपर्कात ४७ जण आले होते, या सर्वांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले तर बारा पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चार जण बरे आज घरी परतले. आता केवळ आठ रुग्ण उपचार घेत आहेत.
पन्हाळगडावर कोरोना संसर्ग थांबत असल्यामुळे वातावरण आनंदमय झाले आहे. पन्हाळा नगरपरिषदेच्या काटेकोर यंत्रणेमुळे पन्हाळगडावर पूर्णपणे संसर्ग थांबण्यास मोठी मदत झाली आहे, तरीदेखील सर्व नागरिकांनी नियमाचे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष रुपाली धडेल व मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी पन्हाळा शहरातील नागरिकांना केले आहे.