मारामारीत चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:10 IST2021-02-05T07:10:01+5:302021-02-05T07:10:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून शाहूपुरीत दोन कुटुंबांत झालेल्या मारामारीत चौघे जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी ...

मारामारीत चौघे जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून शाहूपुरीत दोन कुटुंबांत झालेल्या मारामारीत चौघे जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी शाहूपुरी ६ वी गल्लीत घडली. नरसाराम कंपुजी माळी (वय ७०), किशोर नरसाराम माळी ( ३२ दोघेही रा. शाहूपुरी ६ वी गल्ली) तसेच भालमल धर्माजी माळी (४५, रा. शाहूपुरी ५ वी गल्ली) व नारायण धर्माजी माळी (४२, रा. शाहूपुरी ३ री गल्ली) अशी दोन्हीही गटातील जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.
दोन महिला जखमी
कोल्हापूर : स्टेशन रोड ते दसरा चौक दरम्यान झालेल्या रोड अपघातात दोघे जखमी झाले. सविता सुरेश जाधव (वय ४५) व काशीबाई जोतीराम पवार (६५, दोघेही रा. उचगाव, ता, करवीर) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खोचीचा दुचाकीस्वार जखमी
कोल्हापूर : खोची ते नरंदे या मार्गावर शरद साखर कारखान्यानजीक झालेल्या दुचाकी अपघातात तरुण जखमी झाला. कृष्णात गजानन पाटील (वय २५, रा. खोची) असे जखमीचे नाव आहे. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.