शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ‘हनीट्रॅप’प्रकरणी चौघे जेरबंद, बड्या व्यापाऱ्यांना हेरायचे, मोहजालात अडकवायचे आणि नंतर लुटायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 11:01 IST

बड्या व्यापाऱ्यांना हेरायचे, त्यांना महिला अथवा तरुणाच्या मोहजालात अडकवायचे आणि नंतर या गुंडांच्या टोळीकडून पैशासाठी लुटायचे

कोल्हापूर : मैत्रीचा बहाणा करुन ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून एका व्यापाऱ्याला अडीच लाखाला लुटल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी टोळीतील चौघांना अटक करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली.म्होरक्या सागर पांडुरंग माने (वय ३२, रा. कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा) याच्यासह विजय यशवंत मोरे (३६, रा. व्हन्नूर, ता. कागल), फारुख बाबासाहेब शेख (३२, रा. महाराणा प्रताप चौक), विजय ऊर्फ पिंटू शंकर कुलकुटगी (३९, रा. दौलतनगर, राजारामपुरी) अशी अटक केलेल्या टोळीतील चौघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बड्या व्यापाऱ्यांना हेरायचे, त्यांना महिला अथवा तरुणाच्या मोहजालात अडकवायचे आणि नंतर या गुंडांच्या टोळीकडून पैशासाठी लुटायचे अशा पध्दतीने ‘हनीट्रॅप’ करून व्यापाऱ्यांना लुबाडणाऱ्या तीन टोळ्यांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पर्दाफाश केला आहे.

एका बड्या व्यापाऱ्याला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या हद्दीत अशाच पध्दतीने महिलेला पुढे करुन ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून लुबाडल्याचे उघड झाले आहे. त्या व्यापाऱ्याचे अपहरण करून मारहाण करुन त्याच्यावर बलात्काराची केस नोंदवण्याची धमकी देत अडीच लाख रुपयांना लुबाडले. त्याने लक्ष्मीपुरी पोलिसांत दि. २७ नोव्हेंबरला तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सागर माने, विजय मोरे, फारुख शेख, विजय ऊर्फ पिंटू कलगुडगी या चौघांच्या टोळीला अटक केली.

याच टोळीने इतर ठिकाणीही अनेक व्यापाऱ्यांना लुटल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना इतरही पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून या चौघांचा लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताबा घेऊन अटक केली. चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव करत आहेत.

सहा हनी ट्रॅप

गुंडांच्या टोळ्यांना ‘हनीट्रॅप’मध्ये गुंतवून व्यापाऱ्यांची आर्थिक लुबाडणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बदनामीच्या भीतीने अद्याप अनेक व्यापाऱ्यांनी तक्रारी दिलेल्या नाहीत. आतापर्यंत लक्ष्मीपुरीसह जुना राजवाडा, शाहुपूरी, शिरोली एमआयडीसी, कागल, गोकुळ शिरगाव या पोलीस स्टेशनमध्ये ‘हनीट्रॅप’प्रकरणी व्यापाऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhoneytrapहनीट्रॅपCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस