शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गांधीनगरात पावणे दोन कोटी चोरले, गोव्यात जाऊन १२ लाख उडवले; चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:10 IST

कॅसिनोमध्ये केली मौजमजा : १ कोटी ७८ लाख हस्तगत; गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश

कोल्हापूर : गुडलक स्टेशनरीचे मालक प्रकाश वाधवाणी यांच्या गोडाऊनमधील टेम्पोतून १ कोटी ९० लाखांची रक्कम चोरून पळालेल्या चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. १७) अटक केली. एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ कोटी ७८ लाखांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली. शुक्रवारी (दि. १३) मध्यरात्री रक्कम चोरून पळालेल्या पाचजणांनी गोव्यात जाऊन कॅसिनोमध्ये १२ लाख रुपये उडवले.योगेश किरण पडळकर (३०), सम्राट संजय शेळके (२४), स्वरूप संजय शेळके (२२, तिघे रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) आणि स्वयम सचिन सावंत (१९, रा. बुधवार पेठ, कोल्हापूर) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत, तर राजेंद्रनगरातील एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गुन्ह्याच्या तपासाबाबत माहिती दिली.लक्षतीर्थ वसाहतीमधील योगेश पडळकर याने त्याच्या साथीदारांसह गांधीनगर (ता. करवीर) येथे चोरी केल्याची माहिती उपनिरीक्षक संतोष गळवे आणि अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली होती. संशयित चोरटे हॉकी स्टेडियम परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच सोमवारी सायंकाळी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.अधिक चौकशीत त्यांनी एक कोटी ९० लाखांची रोकड चोरल्याची कबुली दिली. चोरलेली रक्कम त्यांनी बुधवार पेठेत स्वयम सावंत याच्या घरी ठेवली होती. १ कोटी ७८ लाखांची रोकड, गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी आणि ३ मोबाइल असा १ कोटी ७९ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.अल्पवयीन मुलाच्या घरात बसून चोरीचा कटपोलिसांनी अटक केलेल्या टोळीतील सम्राट शेळके याचा भाऊ स्वरूप हा गुडलक स्टेशनरीमध्ये कामाला होता. दिवसभर आलेले पैसे कुठे ठेवले जातात याची त्याला माहिती होती. एक महिन्यापूर्वी राजेंद्रनगर येथे अल्पवयीन मित्राच्या घरात बसून पाच जणांनी गुडलक स्टेशनरीमध्ये चोरी करण्याचा कट रचला. स्टेशनरीमधील कर्मचारी कैलास गोरड यांनी गोडाऊनमधील एका टेम्पोच्या डॅशबोर्डमधील कप्प्यात पैसे ठेवल्याची माहिती स्वरूप शेळके याने शुक्रवारी रात्री त्याच्या मित्रांना दिली. त्यानुसार इतर चौघांनी दोन दुचाकींवरून जाऊन गुडलक स्टेशनरीच्या गोडाऊनचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर टेम्पोच्या काचा फोडून पैशांचे पोते घेऊन निघून गेले. चोरी करायला जाताना ते एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले.दोन दिवसांत १२ लाखांची मौजमजाचोरलेले पैशांचे पोते बुधवार पेठेतील घरी लपवून अल्पवयीन मुलासह स्वयम सावंत आणि योगेश पडळकर हे तिघे गोव्याला गेले. त्यांनी दोन दिवसांत कॅसिनोमध्ये तब्बल १२ लाख रुपये उडवले. यातील काही रक्कम त्यांनी आणखी कोणाला दिली आहे काय, याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोठा हात मारण्यासाठी..या टोळीतील स्वयम सावंत याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. कामधंदा करीत नसल्याने या सगळ्यांकडे पैशांची चणचण होती. चैनीसाठी मोठा हात मारण्याचे नियोजन ते अनेक दिवसांपासून करीत होते. अखेर मोठा हात मारला आणि तीन दिवसांत ते पोलिसांच्या हाती लागले.