चार आरोपी गजाआड

By Admin | Updated: June 30, 2015 22:42 IST2015-06-30T22:42:27+5:302015-06-30T22:42:27+5:30

सुप्रीम कंपनीने भिवंडी - मनोर या महामार्गासाठी संपादीत केलेल्या २२ शेतकऱ्यांच्या जमीनीपोटी त्यांना दिलेले १.३१ कोटी त्यांच्या खात्यात जमा करून परस्पर त्याचा अपहार

Four accused GajaAd | चार आरोपी गजाआड

चार आरोपी गजाआड

शाळेला घंटा नाही, मात्र मुलांना स्वयंशिस्त आहे. मुलं सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत शाळेत येतात; पण ताण, थकवा नसतो. शिक्षकांची अध्यापनाची पद्धत इतकी आनंददायी आहे. खेळातूनसुद्धा शिक्षण देता येते, हे शाळेतील दोन शिक्षकांनी सिद्ध केले आहे. देवेकर आणि कोठेकर हे ते दोन शिक्षक मुलांना दर्जेदार, उपक्रमशील शिक्षण देण्यासाठी झपाटलेले आहेत. ही शाळा आहे शिंदेवाडी (ता. भुदरगड) येथील विद्यामंदिर.
गारगोटीच्या पूर्वेस दोन किलोमीटरवर ८५0 लोकसंख्या असलेले शिंदेवाडी (ता. भुदरगड) हे गाव आहे. बहुतेक कुटुंबांतील पुरुष मंडळी गवंड्याचे काम करतात. गवंड्याचे गाव तेही भांडखोर गाव, अशी ओळख असलेले; पण अशी ओळख पुसण्याचे काम जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर शाळेने केले आहे. गावाशी एकरूप झालेले आणि सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रमांनी झपाटलेले शिक्षक येथे आहेत. त्यांनी शाळेची घंटा काढून टाकायचे ठरविले आणि ग्रामस्थांनी साथ दिली व शिक्षकांची चिकाटी, जिद्द, प्रयत्नशीलता पाहून पालकांनी सहकार्याची भूमिका घेतली.
मुलांना कंटाळा येत नाही. कारण त्याच त्या कृती नसून, त्यातही शिक्षकांनी विविधता आणली आहे. अध्ययन अध्यापनाचा आनंद या शाळेत लुटला जातोय. स्वयंशिस्त तर आपोआप येतेय. कंटाळ्याला पळवून लावण्याचे कृती शिक्षण पाहायचे असेल, तर शिंदेवाडी विद्यामंदिराला भेट द्या.
कात्रण पट्ट्या वाचन, समूहगीते, पसायदान, दिनविशेष, असे विविध संस्कार सुरू आहेत. शाळेच्या वैशिष्ट्यपूर्ण कात्रणसंग्रहात शालोपयोगी ९० हजार कात्रणांचा संग्रह आहे. नावीन्यपूर्ण वर्ग सजावट, टिकाऊपणासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर, भाषा शिक्षणाचा खेळ, शब्दकोडी, विरुद्धार्थी शब्द, शब्दांची वाक्यांची झाडे बनविणे. यामुळे मुलांची भाषा समृद्ध झाली आहे. शब्दसंग्रह वाढला. वाचन लेखन सुधारले. गटपद्धतीमुळे सर्व मुलांचा सहभाग वाढला. प्रत्येक मुलगा गटात विद्यार्थी, शिक्षक भूमिका करीत असल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढला. बुद्ध्यांक वाढला. शाळेची-शिक्षणाची गोडी वाढली. शिक्षणाचा सर्वांगीण गुणवत्ता विकास याहून वेगळा तो काय असणार?
शिक्षकांनी तिसरी-चौथीच्या मुलांची पाठ्यपुस्तकातील घटकांवर आधारित नाट्यीकरण बसविली आहेत. इंग्रजी गोष्टींची नांट्यीकरण बसविली आहेत. मराठीप्रमाणे इंग्रजीतूनही अभिव्यक्ती करता यावी, संवाद साधता यावा, भाव व्यक्त करता यावा, इंग्रजी भाषेविषयीची भीती कमी व्हावी म्हणून शिक्षक वेगवेगळे प्रयोग, छोटे-छोटे उपक्रम विद्यालयात राबवित आहेत. गणित विषयासाठी असे छोटे-छोटे खेळ आणि उपक्रम शिक्षक घेत आहेत.
शिक्षकांची चिकाटी व झोकून देऊन काम करणे, पालकांचे सहकार्य, एवढेच काय पाल्यांनीच पालकांना सुधरवले, दारूचे व्यसन सोडवले ही किमया शिंदेवाडी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची असून, यातूनच गावाने आणि शासकीय अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. एवढेच काय पण शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी हे शाळेची अभिमानाची बाब व गुणवत्तेची साक्ष आहे. शैक्षणिक गुणवत्ता झाकून राहत नाही, सुगंध दरवळतो. गारगोटी हे शिक्षणाचे केंद्र तरीही गारगोटीतील २३ विद्यार्थी शिंदेवाडी शाळेत जाऊ लागले आहेत. शिंदेवाडी विद्यामंदिर शाळा लई भारी आणि शिक्षण गुणकारी! शिक्षण संबंधित सर्व घटकांना अभिमान वाटावा असेच शिक्षक शिंदेवाडीचे आणि गुणी, प्रज्ञावंत, शिस्त व स्वयंअध्ययनाचे संस्कार असणारे विद्यार्थी! शिक्षकांचे कौतुक करायला शब्दच अपुरे.
- डॉ. लीला पाटील

शाळेची वैशिष्ट्ये
शाळेत शिकविण्यात येणारे धडे, खेळ यांना प्रात्यक्षिकांची जोड मिळते. प्रत्येक धड्यांमध्ये मुलांना सहभागी करून घेण्यात येते.
परिपाठात मुलं यावेळी पुस्तकात वाचलेली बोधकथा सांगतात. वाचलेल्या पुस्तकांविषयी बोलतात. परिपाठावेळी माहिती सांगतात.
परिपाठावेळी नवीन म्हणी, वाक्यप्रचार शब्दसमूह, एक पाढा, पुस्तक ओळख, आदींचे शिक्षण शिक्षक
देतात.
ज्ञानभिंत हा विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढविणारा उपक्रम आहे. मुलांचा
सहभाग वाढवून अध्ययन, अध्यापन प्रक्रिया मनोरंजनात्मक सजीव करण्याचा उपक्रम आहे.

Web Title: Four accused GajaAd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.