Kolhapur: कांचनताई परुळेकर यांचे निधन, स्वयंसिद्धाच्या माध्यमातून महिलांना दिले आर्थिक स्वावलंबनाचे धडे

By समीर देशपांडे | Updated: March 26, 2025 16:53 IST2025-03-26T16:48:29+5:302025-03-26T16:53:29+5:30

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रभर गेले तीन दशकांहून अधिक काळ ‘स्वयंसिद्धा’ संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता, अन्याय निवारण व ...

Founder of Swayamsiddha Kanchantai Parulekar passes away | Kolhapur: कांचनताई परुळेकर यांचे निधन, स्वयंसिद्धाच्या माध्यमातून महिलांना दिले आर्थिक स्वावलंबनाचे धडे

Kolhapur: कांचनताई परुळेकर यांचे निधन, स्वयंसिद्धाच्या माध्यमातून महिलांना दिले आर्थिक स्वावलंबनाचे धडे

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रभर गेले तीन दशकांहून अधिक काळ ‘स्वयंसिद्धा’ संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता, अन्याय निवारण व आरोग्यविषयक निष्ठापूर्वक कार्य करणार्‍या कांचनताई परुळेकर (वय ७४) यांचे आज, बुधवारी दुपारी निधन झाले. 

महिला सबलीकरणासाठी ध्यास पूर्ण जीवन जगलेल्या कांचनताई यांनी शहरी आणि ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी उद्योजकतेचे धडे दिले. प्रशिक्षण, नियोजन आणि अंमलबजावणी यांच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभारण्याची प्रेरणा त्यांनी त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून दिली. 

गेले काही वर्षे त्या कर्करोगाने आजारी होत्या अशातच दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडली. त्यांच्यावर उद्या गुरुवारी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

Web Title: Founder of Swayamsiddha Kanchantai Parulekar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.