पक्षिगणनेत रंकाळ्यावर ७४ प्रजातींच्या ९५२ पक्ष्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 04:58 PM2020-01-08T16:58:03+5:302020-01-08T16:59:35+5:30

‘बर्डस आॅफ कोल्हापूर’ या फेसबुक ग्रुपकडून कोल्हापूरच्या वेगवेगळ्या भागांतील पक्ष्यांची गणना करणे सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या टप्प्यात कोल्हापुरातील रंकाळा तलावावरील केलेल्या पक्ष्यांच्या गणनेत ७४ प्रजातींचे ९५२ पक्षी नोंदले गेले.

Forty-nine species of birds of 5 species are recorded on the census | पक्षिगणनेत रंकाळ्यावर ७४ प्रजातींच्या ९५२ पक्ष्यांची नोंद

पक्षिगणनेत रंकाळ्यावर ७४ प्रजातींच्या ९५२ पक्ष्यांची नोंद

Next
ठळक मुद्देपक्षिगणनेत रंकाळ्यावर ७४ प्रजातींच्या ९५२ पक्ष्यांची नोंदस्थलांतरित १५ प्रजाती : स्थानिक चार प्रजातींचा समावेश

कोल्हापूर : ‘बर्डस आॅफ कोल्हापूर’ या फेसबुक ग्रुपकडून कोल्हापूरच्या वेगवेगळ्या भागांतील पक्ष्यांची गणना करणे सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या टप्प्यात कोल्हापुरातील रंकाळा तलावावरील केलेल्या पक्ष्यांच्या गणनेत ७४ प्रजातींचे ९५२ पक्षी नोंदले गेले.

कळंबा तलाव आणि शिवाजी विद्यापीठ परिसरानंतर पक्षिगणनेच्या मालिकेतील तिसऱ्या टप्प्यातील गणना रंकाळा तलावावर करण्यात आली. या गणनेत स्थलांतरित पक्ष्यांच्या १५ प्रजाती होत्या, तर ४ प्रजाती या स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांच्या होत्या.

चित्रबलाक, काळ्या डोक्याचा शराटी, नदी सुरय या तिसऱ्या टप्प्यातील गणनेत मोजल्या गेलेल्या पक्षीप्रजाती या आययूसीएन (इंटरनॅशनल यूनियन फॉर कॉन्झर्वेशन आॅफ नेचर) जागतिक संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत टाकलेल्या ‘संकटग्रस्त’ पक्षीप्रजाती आहेत.

यावेळी थापट्या बदक, वेळूतला दंगेखोर वटवट्या, युरेशियन दलदल हरीण, तपकिरी खाटीक, धूसर पांगळी, नदी सुरय, ठिपकेवाली तुतारी या पक्ष्यांच्या काही प्रजातींची नोंद झाली.

कोल्हापूर शहराबरोबरच गारगोटी, गडहिंग्लज येथून आलेल्या ८६ पक्षिप्रेमींनी या गणनेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. सुहास वायंगणकर, फारुख म्हेतर, रमन कुलकर्णी, स्वप्निल पवार, आशिष कांबळे, कृतार्थ मिरजकर, दिलीप पाटील, मधुकर धर्माधिकारी आणि अमित कारंडे या निसर्गतज्ज्ञांनी या गणनेत मार्गदर्शन केले.

प्रणव देसाई आणि सत्पाल गंगलमाले यांनी या पक्षिगणनेच्या मालिकेचे संयोजन केले आहे. या मालिकेतील पुढील गणना राजाराम तलावावर रविवार, दि. १२ जानेवारी रोजी सकाळी होणार आहे.
 

 

Web Title: Forty-nine species of birds of 5 species are recorded on the census

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.