माजी आमदार सुरेश पाटील यांचे निधन

By विश्वास पाटील | Updated: October 16, 2022 23:22 IST2022-10-16T23:21:54+5:302022-10-16T23:22:05+5:30

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांचे ते मामेभाऊ होत.

Former MLA Suresh Patil passed away | माजी आमदार सुरेश पाटील यांचे निधन

माजी आमदार सुरेश पाटील यांचे निधन

कोल्हापूर : 

पुणे शिक्षक मतदार संघातील माजी आमदार आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे जेष्ठ आजीव सदस्य सुरेश विठ्ठलराव चव्हाण-पाटील (वय 83 रा.तक्षक अपार्टमेंट ताराबाई कोल्हापूर) यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने बेळगाव येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांचे ते मामेभाऊ होत. ते मूळचे बेळगाव असले तरी जडणघडण कोल्हापुरात झाली..विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वाटचालीतही त्यांचे योगदान राहिले. आपल्या मूळगावी आपला शेवटचा श्वास जावा अशा भावनेने त्यांनी मुलग्यास बेळगावला न्यायला लावले होते..तिथेच आज सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Web Title: Former MLA Suresh Patil passed away