- विश्वास पाटील
कोल्हापूर : भुदरगड तालुक्याचे काँग्रेसचे नेते, राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले माजी आमदार दिनकरराव जाधव (वय ८५) यांचे कोल्हापूरात खासगी रुग्णालयात आज शनिवारी रात्री निधन झाले.
अंत्यविधी उद्या रविवारी सकाळी तिरवडे येथे त्यांच्या मूळगावी होणार आहेत. बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा राहिला. सतत हसतमुख असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. गोरगरिब जनतेला त्यांचा कायमच मोठा आधार राहिला.