शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक, गोकुळ दूध संघात सत्तांतर?; खासदार महाडिकांच्या दाव्यावर माजी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 17:16 IST

..त्यानंतर ते याबाबतचा उल्लेख कधीच करणार नाहीत

कोल्हापूर : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणातही बदल होणार असल्याच्या चर्चेला ऊत आला होता. यावर माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनीही याआधी स्पष्टीकरण देत कोणताही बदल होणार नसल्याचे सांगितले होते. यानंतर आज, पुन्हा माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफांनी देखील यावर भाष्य केलं आहे. मुश्रीफ म्हणाले, खासदार धनंजय महाडिक दावा करीत आहेत त्याप्रमाणे जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी मुश्रीफ म्हणाले, खासदार धनंजय महाडिक यांनी केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघाची सत्ता याबाबत केलेला दावा मी प्रसारमाध्यमांमध्ये वाचला आणि बघितला. खासदार महाडिक यांनी कदाचित हा दावा आमदार सतेज पाटील यांना नजरेसमोर धरून केला असावा. दरम्यान;  या दोन्हीही संस्थांच्या सत्तांमध्ये हसन मुश्रीफ हासुद्धा एक घटक आहे, हे कदाचित ते विसरले असतील.ते पुढे म्हणाले, केडीसीसी बँक आणि गोकुळ या दोन्हीही ठिकाणी सत्ताबदल अजिबात होणार नाही. कारण निवडून आलेले जे संचालक आहेत त्यांच्यासाठी अनेक सभासदांनी आणि कार्यकर्त्यांनी खस्ता खालेल्या आहेत. त्यामुळे कुणीही कार्यकर्ता आणि संचालक या सत्ताबदलाला अनुकूल नसावा.उच्चांकी दूध दरवाढबँकेची सत्ता अनेक वर्ष आपल्याकडे आहे. गोकुळ दूध संघाची सत्ता वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे आलेली आहे. गोकुळच्या इतिहासात म्हशीच्या दुधाला लिटरला सहा रुपये आणि गाईच्या दुधाला लिटरला पाच रुपये इतकी उच्चांकी दूध दरवाढ केलेली आहे. वार्षिक तीन हजार रुपये कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल वाढलेली आहे. तसेच; यापूर्वी दूध पावडर निर्मितीमध्ये गोकुळ दूध संघाला कधीच फायदा होत नव्हता. निव्वळ गेल्या आर्थिक वर्षात तब्बल १२ कोटी रुपये फायदा हा दूध पावडर विक्रीमधून झालेला आहे."त्यांना खासगीत पटवून देईन....."नजीकच्या काळात खासदार महाडिक आणि माझी भेट झाली तर मी त्यांना समजावून सांगून पटवून देईन. या दोन्हीही संस्थांची आर्थिक प्रगती आणि सभासदाभिमुख कारभार, याबाबत त्यांना समजावून सांगेन. त्यानंतर ते याबाबतचा उल्लेख कधीच करणार नाहीत, असा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलbankबँकGokul Milkगोकुळ