शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मला कोण काय करते बघूयाच; जुनी देणी वसुलीसाठी कोल्हापुरातील माजी आमदार अभिषेक मिल्समध्ये घुसले, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:01 IST

पोलिसांत रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद झाली नव्हती

कोल्हापूर : हुपरी रोडवरील अभिषेक स्पिनिंग मिल्समध्ये गुंतवणूक केलेली रक्कम परत मागण्यासाठी मंगळवारी माजी आमदारप्रकाश आवाडे हे कुलूप तोडून आत घुसले. कर्मचारी कुलूप काढत नाहीत म्हटल्यावर कुलूप तोडा, मला कोण काय करते बघूयाच असे ते म्हणत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यासंदर्भात गोकुळ शिरगाव पोलिसांत रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद झाली नव्हती, परंतु घडलेला प्रकार पोलिस अधीक्षकांना कळवण्यात आल्याचे व ११२ क्रमांकावर माहिती दिल्याचे मिल्सच्या वतीने सांगण्यात आले.मिल्सकडून दिलेली माहिती अशी : या मिल्सचे भागीदार अण्णासाहेब मोहिते यांना साधारणत: २०१९ च्या अगोदर या मिल्ससाठी आर्थिक गरज होती. म्हणून त्यांनी तत्कालीन आमदारप्रकाश आवाडे यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी त्यांच्या बँकेतून कर्ज द्यावे, अशी मागणी केली. परंतु आवाडे यांनी तसे न करता स्वत:जवळील ४ ते ५ कोटी रुपये या प्रकल्पामध्ये गुंतवले व प्रकल्पाचे भागीदार झाले. त्याच दरम्यान इचलकरंजीतील एका वकिलाने उच्च न्यायालयात प्रकल्पासंबंधी तक्रारी केल्या. त्यामुळे प्रकल्प सुरू होण्यास अडचणी आल्या. कोरोनामुळे त्यात भर पडली. त्याचा निकाल मिल्सच्या बाजूने लागला. परंतु नंतर करावी लागणारी गुंतवणूक न करता ते भागीदारीतून बाहेर पडले. त्यामुळे हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालला नाही. तोपर्यंत स्वत: मोहिते यांचेही निधन झाले. मी केलेली गुंतवणूक व्याजासह परत करावी, असे आवाडे यांची मागणी आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्यांनी त्यासाठी तगादा लावला आहे. परंतु पैसे न मिळाल्याने मंगळवारी कुलूप तोडून मिल्समध्ये घुसले. तेथील कामगारांशी त्यावरून थोडी वादावादी झाली. त्यामुळे कामगारांनी ११२ क्रमांकावर माहिती दिली. पोलिस आले तेव्हा तिथे कोणही नव्हते.

हा आमचा घरगुती मॅटर आहे. त्यामध्ये बातमी देण्यासारखे काही नाही. - प्रकाश आवाडे, माजी आमदार इचलकरंजी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMLAआमदारPrakash Awadeप्रकाश आवाडे