शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 10:32 IST

आठवड्याला दूधाच्या माध्यमातून पैसा मिळू लागल्याने प्रत्येक कुटुंबात दुधाची क्रांती आणण्याचे काम काम रवींद्र आपटे यांनी केले आहे. 

- सदाशिव मोरे

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष  व महानंदा दूध डेअरीचे उपाध्यक्ष रवींद्र पांडुरंग आपटे यांचे रात्री निधन झाले. त्यांनी गोकुळ दूध संघावर सलग ३५ वर्षे संचालक, दोन वेळा अध्यक्ष म्हणून काम पाहिले. वासरू संगोपनसारख्या योजना गोकुळच्या माध्यमातून राबवून शेतकरी कुटुंबात क्रांती घडविण्याचा प्रयत्न रवींद्र आपटे यांनी केला. कोल्हापूर येथे दुपारी १२ नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

१९८७ पूर्वी त्यांनी बीएससी अॅग्रीचे शिक्षण घेऊन उत्तूर ( ता. आजरा ) येथे गाईचा गोठा सुरू केला होता. देशात परदेशातही चांगल्या नोकरीची संधी असताना त्यांनी दुग्ध व्यवसायाकडे दिले. आपल्या गाईच्या गोठ्यातील दूध पाठविण्यासाठी उत्तुर येथे जनता दूध डेअरीची स्थापना केली. त्यांनी गायीच्या गोठ्याच्या माध्यमातून विविध प्रयोगातून दूधाची वाढ केल्यामुळे गोकुळ दूध संघावर काम करण्याची संधी मिळाली. १९८७ ते २०२२ पर्यंत सलग ३५ वर्षे गोकुळवर त्यांनी संचालक म्हणून काम केले आहे.

तालुक्यात १५ ते २० असणाऱ्या दूध संस्था त्यांच्या काळात ३०० ते ३५० च्या दरम्यान पोहोचल्या. दूधामध्येही विक्रमी वाढ झाली. दूध संस्था गावोगावी तयार झाल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहू लागले. आठवड्याला दूधाच्या माध्यमातून पैसा मिळू लागल्याने प्रत्येक कुटुंबात दुधाची क्रांती आणण्याचे काम काम रवींद्र आपटे यांनी केले आहे. 

गोकुळच्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास  शंभर ते दीडशे मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. आजरा ट्रान्स्पोर्ट हा व्यवसायही त्यांनी चांगल्या पद्धतीने चालविला.उत्तूर व आजरा येथील शेतीमध्ये त्यांनी विविध प्रयोग केले आहेत. त्यांच्या पश्चात महालक्ष्मी बँक कोल्हापूरच्या संचालिका पद्मजा आपटे, दोन मुलगे, सून व भाऊ सुधीर आपटे असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ