माजी उपमहापौर मोहन गोंजारे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:17 IST2021-06-06T04:17:34+5:302021-06-06T04:17:34+5:30
कोल्हापूर : विक्रमनगर येथील माजी उपमहापौर मोहन यशवंत गोंजारे (वय ५२) यांचे शनिवारी कोरोनाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

माजी उपमहापौर मोहन गोंजारे यांचे निधन
कोल्हापूर : विक्रमनगर येथील माजी उपमहापौर मोहन यशवंत गोंजारे (वय ५२) यांचे शनिवारी कोरोनाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा परिवार आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यामुळे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गाेंजारे यांनी २०१० मध्ये विक्रमनगर प्रभागातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली. त्यांनी २०१० ते २०१५ या कालावधीत प्रभागाचे नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रतिनिधित्व केले. २ जानेवारी २०१४ ते २२ जूलै २०१५ या कालावधीत त्यांनी उपमहापौरपद भूषवले. या कालावधीत त्यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. रक्षाविसर्जन आज रविवारी सकाळी ७ वाजता आहे.
--
फोटो नं ०५०६२०२१-कोल-माेहन गोंजारे(निधन)
--