माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची के. आर. मोटर्सला सदिच्छा भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST2020-12-24T04:22:40+5:302020-12-24T04:22:40+5:30
कोल्हापूर : मार्केट यार्ड येथील के. आर. मोटर्सच्या शोरूमला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यानिमित्ताने ...

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची के. आर. मोटर्सला सदिच्छा भेट
कोल्हापूर : मार्केट यार्ड येथील के. आर. मोटर्सच्या शोरूमला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यानिमित्ताने सोनवणे कुटुंबियांशी शिंदे यांच्या असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांनाही उजाळा मिळाला.
शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी वेळात वेळ काढून सोनवणे कुटुंबियांच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या या शोरूमला भेट दिली. के. आर. मोटर्स प्रा. लि., ही मारुतीची जिल्ह्यातील अधिकृत डीलर आहे.
शिंदे यांचे स्वागत के. आर. मोटर्सतर्फे चेअरमन कमलाकर रामकृष्ण सोनवणे यांनी केले. यावेळी बाळासाहेब रामकृष्ण सोनवणे, हरिदास रामकृष्ण सोनवणे, शिरीषकुमार रामचंद्र सोनवणे, प्रवीण हरिदास सोनवणे, कुणाल सोनवणे, सम्राट सोनवणे, करण सोनवणे, अर्जुन सोनवणे, रोहित सोनवणे, पृथ्वीराज सोनवणे, प्रवीणकुमार चव्हाण उपस्थित हाेते.
फोटो: २३१२२०२०-कोल-केआरमोटर्स
फोटो ओळ:
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कोल्हापुरातील के. आर. मोटर्सला सदिच्छा भेट दिली. यावेळी सोनवणे कुटुंबियांतर्फे चेअरमन कमलाकर सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.