लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:28 IST2021-02-25T04:28:39+5:302021-02-25T04:28:39+5:30

जयसिंगपूर : लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करावीत, अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्यावतीने उपकार्यकारी अधिकारी कडाळे यांना देण्यात आले. ...

Forgive the electricity bills during the lockdown period | लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करा

लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करा

जयसिंगपूर : लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करावीत, अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्यावतीने उपकार्यकारी अधिकारी कडाळे यांना देण्यात आले. वीज बिले माफ न केल्यास आठवड्याभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले. त्यामुळे आर्थिक स्थिती कोलमडली होती. अशी परिस्थिती असताना भरमसाट वीज बिले तयार करून ग्राहकांना देण्यात आली. त्यामुळे ही वीज बिले तत्काळ माफ करावीत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अक्षय पाटील, चंद्रकांत जाधव-घुणकीकर, डॉ. विकास पाटील, आकाश खोत, योगेश सारस्वत, राहूल पाटील, अशोक पाटील, अमोल धुमाळे, संताजी जाधव, तानाजी जाधव, अनंत विभूते, संजय चव्हाण, अमोल शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

फोटो - २३०२२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने महावितरण कार्यालयास निवेदन देण्यात आले.

Web Title: Forgive the electricity bills during the lockdown period