व्यावसायिकांचा फाळा माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST2021-01-13T05:00:47+5:302021-01-13T05:00:47+5:30
गडहिंग्लज : कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे आठ महिने सर्व व्यवसाय बंद होते. अनलॉकनंतरही व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांच्या ...

व्यावसायिकांचा फाळा माफ करा
गडहिंग्लज : कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे आठ महिने सर्व व्यवसाय बंद होते. अनलॉकनंतरही व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी कोरोना काळातील व्यावसायिकांचा फाळा माफ करावा, अशी मागणी गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेऊन नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, व्यवसाय बंद असल्यामुळे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. शासनाकडून त्यांना उभारी देण्यासाठी कोणतीच मदत मिळालेली नाही. असे असताना व्यावसायिकांना पालिकेला फाळा भरावा लागत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातील त्यांचा फाळा माफ करण्यात यावा.
यावेळी आमदार संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर आदींची उपस्थिती होती.