शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

इतर गट-तट विसरून कोल्हापुरात उद्धव ठाकरे गट म्हणूनच कामाला लागा : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 12:59 IST

Shiv Sena, Uday Samant, kolhapur , Uddhav Thackeray कोणत्याही गटबाजीला थारा देणार नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून शिवसेनेत एकच उद्धव ठाकरे गट राहील. त्यानुसार कामाला लागा, असे इशारा वजा आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे शिवसैनिकांना केले. आमचं पण, ठरलंय, जे काही ठरलंय ते वेळ येईल, तसे जाहीर केले जाईल. आमच्या एकीची वज्रमूठ कोणी भेदू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देइतर गट-तट विसरून कोल्हापुरात उद्धव ठाकरे गट म्हणूनच कामाला लागा : उदय सामंत पक्षाच्या विस्तारासाठी एकीची वज्रमूठ करा

 कोल्हापूर : कोणत्याही गटबाजीला थारा देणार नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून शिवसेनेत एकच उद्धव ठाकरे गट राहील. त्यानुसार कामाला लागा, असे इशारा वजा आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे शिवसैनिकांना केले. आमचं पण, ठरलंय, जे काही ठरलंय ते वेळ येईल, तसे जाहीर केले जाईल. आमच्या एकीची वज्रमूठ कोणी भेदू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.येथील शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मंत्री सामंत यांची शिवसेनेने कोल्हापूरच्या संपर्क मंत्रिपदी निवड केली आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील शिवसैनिकांच्यावतीने जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात पक्षाच्या विस्तारासाठी एकीची वज्रमूठ करावी. संघटनात्मक बांधणी करणे, विकासात्मक कामे जनतेपर्यंत पोहोचविणे, आदींबाबत विचारविनिमय करण्यासाठी सेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. राज्यात ठरल्यानुसार कोल्हापुरात शिवसेनेला न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी येत्या दहा दिवसांमध्ये पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

या मेळाव्यास माजी आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सुरेश साळोखे, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, महिला आघाडीच्या शुभांगी पवार, मंगल चव्हाण, स्मिता माने, हर्षल सुर्वे, मंजित माने, आदी उपस्थित होते. शिवाजीराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले.कोण काय म्हणाले

  •  खासदार माने : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे नियोजन करून त्यामध्ये शिवसैनिकांना संधी द्या.
  •  आमदार आबिटकर : कोल्हापूर शिवसेनामय करण्यासाठी शिवसैनिक आपल्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहील.
  •  जिल्हाप्रमुख पवार : शासकीय समित्या, निवडणुकांमध्ये शिवसैनिकांना संधी मिळावी. पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न व्हावेत. 
  • मंत्री सामंत म्हणाले : जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये काही मतभेद असतील, तर एकत्र बसून मिटविले जातील
  • जुने शिवसैनिक, महिला-भगिनी कार्यकर्त्या, युवा सैनिकांना न्याय देणार
  • सांघिकपणे, प्रत्येकाच्या विचाराने काम करणार
  • शाखाप्रमुखांची यादी प्रामाणिकपणे द्यावी.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतkolhapurकोल्हापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरे