शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: सव्वादोन लाखांची विदेशी मद्यसाठा जप्त, एकास अटक; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

By तानाजी पोवार | Updated: August 29, 2022 17:28 IST

सव्वादोन लाखांच्या विदेशी मद्यसाठा व चारचाकी वाहन असा सुमारे ५ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : अवैध मद्याची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाने शेर्ले (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे छापा टाकून सव्वादोन लाखांच्या विदेशी मद्यसाठा व चारचाकी वाहन असा सुमारे ५ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल, रविवारी रात्री उशिरा केली. याप्रकरणी पथकाने मोटारचालक श्रीकृष्ण सुभाष कदम (वय ३२ रा. चव्हाटेश्वर मंदिर हुमरमळा, अणाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यास अटक केली.भरारी पथकाने दिलेली माहिती अशी की, शेर्ले गावच्या हद्दीतून विदेशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये शेर्ले येथे छापा टाकला. कागदी पुट्ट्याच्या बॉक्समध्ये गोवा राज्यात विक्रीकरिता असलेले भारतीय बनावटीचे विविध कंपनीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. मद्याच्या सीलबंद ४२० प्लास्टिकच्या बाटल्या, बिअरचे १२० टिन असे एकूण २ लाख २६ हजार २०० रुपये किमतीचा ४० बॉक्स विदेशी मद्यसाठा व मोटार कार असा सुमारे ५ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर, कारचालकास अटक केली.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त बी. एच. तडवी यांच्या आदेशाने दुय्यम निरीक्षक एस. जे. ढेरे, एस. एस. गोंदकर व कॉन्स्टेबल सुशांत बनसोडो, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस