भावजयीला मूल होत नाही म्हणून जबरदस्तीने गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:14 IST2018-09-27T01:14:13+5:302018-09-27T01:14:16+5:30

Forcibly due to childbirth abortion | भावजयीला मूल होत नाही म्हणून जबरदस्तीने गर्भपात

भावजयीला मूल होत नाही म्हणून जबरदस्तीने गर्भपात

कोल्हापूर : थोरल्या दीर-भावजयीला मूलबाळ नाही; त्यांना झाल्याशिवाय आपणाला मूल नको म्हणून पतीसह सासरच्या लोकांनी जबरदस्तीने आपला घरीच गर्भपात केल्याची माहिती विवाहितेने चौकशीदरम्यान करवीर पोलिसांना दिली. चुलत दीर डॉ. दिगंबर शेलार (रा. कुडित्रे, ता. करवीर) याने आपणाला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचे सांगितले आहे.
संशयित प्रवीण श्रीरंग शेलार (पती), सासू आनंदीबाई शेलार, सासरे श्रीरंग शेलार, दीर डॉ. शेलार, जाऊ रेश्मा शेलार (सर्वजण रा. कुडित्रे) व नणंद समीर नाळे, नणंदेचा नवरा समीर बाळासाहेब नाळे (रा. लिंगम कॉलनी, संभाजीनगर परिसर) हे गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच पसार झाले आहेत. बुधवारी करवीर पोलिसांनी या सर्वांची घरझडती घेतली असता ते मिळून आले नाहीत.
फिर्यादी शुभांगी प्रवीण शेलार (वय २७, रा. चावरे, ) ही पतीसह पुण्याला राहण्यास होती. २०१६ पासून प्रवीण हा तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत असे. शुभांगी गर्भवती राहिल्यानंतर थोरले दीर-भावजयी यांना मूलबाळ नसल्याने त्यांना झाल्याशिवाय आपणाला मूल नको म्हणून पतीसह सासरच्या लोकांनी माहीत नसताना गर्भपाताची औषधे दिल्याची माहिती शुभांगी यांनी दिली.

Web Title: Forcibly due to childbirth abortion