शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: राधानगरी धरणाच्या वक्राकार दरवाजांचा प्रस्ताव शासनाला सादर, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:20 IST

पाणीसाठा कमी ठेवण्याचे नियोजन

कोल्हापूर : राधानगरीधरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणाची विसर्ग क्षमता वाढवण्यासाठी मुख्य धरण व स्वयंचलित दरवाजे यांच्यामध्ये असलेल्या टेकडीमध्ये बारा बाय आठ मीटर आकाराची ३ वक्र दरवाजे बसवण्यात येणार आहेत. या कामाचे अंदाजपत्रक तयार करुन राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या मान्यतेने प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणीसाठा कमीत कमी ठेवण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार शाहू छत्रपती, आमदार अमल महाडिक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, पाटबंधारे विभागाचे अध्यक्ष अभियंता अभिजित म्हेत्रे, ऋतुराज इंगळे व सुहास निंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी शाहू छत्रपती यांनी धरणातील पाणीसाठा, वीजनिर्मिती प्रकल्प याची माहिती घेतली.जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, चालू हंगामामधील धरणामध्ये जास्त प्रमाणात पाणी शिल्लक आहे.मे महिन्यामध्ये अतिरिक्त पाऊस लागल्याने धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक राहिला तसेच पंचगंगा नदीतील को.प.बंधाऱ्यातील बरगे काढण्यास अडचण निर्माण झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये बरगे काढून धरणातून २५00 क्यूसेक्स विसर्ग चालू केला आहे. पावसाचा अंदाज घेत विसर्ग जास्तीत जास्त दिवस ठेवून धरणातील पाणीसाठा कमी करण्याचे नियोजन आहे.आमदार अमल महाडिक म्हणाले, महापूर नियंत्रणासाठीच्या राधानगरी धरणाची कामे जागतिक बँकेच्या सहकार्याने होत असलेल्या ३२00 कोटींच्या प्रकल्पांतर्गत समाविष्ट केली आहेत. याचे सविस्तर संकल्पने व आराखडे तयार होत आहेत. त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळम्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.अभिजीत म्हेत्रे म्हणाले, धरणावरील ५ सेवाद्वारांपैकी २ सेवाद्वारे बंद केल्याने विसर्ग क्षमता १६०० क्युसेक्सपर्यंत घटली आहे. उर्वरित ३ सेवाद्वारे ही फारच जुनी झाल्याने येथे हायड्रॉलिक होयिस्ट यंत्रणा बसवण्यात येणार आहे. राधानगरी धरणस्थळावरील जुने वीजनिर्मिती केंद्र महाजनको यांच्या अखत्यारीत असून, ते २०१७ पासून बंद आहे. केंद्र चालू करण्यासाठी महाजनकोकडे विनंती केली आहे.