शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मराठा सर्वेक्षण: आमची जात दारावरच्या पाटीवर दिसत नाही काय?; कर्मचाऱ्यांना बरे-वाईट अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 15:55 IST

माहिती देतानाही अनेक जण ‘उपकार’ करत असल्यासारखी माहिती देत असल्याचा अनुभव

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी म्हणून खुल्या प्रवर्गातील सर्वांचेच सर्वेक्षण सध्या जिल्ह्यात साडेसात हजार शासकीय कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. प्रत्येक खुल्या गटाच्या घरात जाऊन त्यांना १८२ प्रश्न विचारावे लागत आहेत, परंतु त्याची माहिती देतानाही अनेक जण ‘उपकार’ करत असल्यासारखी माहिती देत असल्याचा अनुभव काहींना येत आहे. ‘आमची जात दारावरच्या पाटीवर दिसत नाही काय?’ चक्क अशी विचारणा एका शिक्षकाला करण्यात आली आहे. ग्रामीण भागात मात्र परिस्थिती वेगळी आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने सरकार जागे झाले आणि त्यांनी दिलेले वेळापत्रक पूर्ण करताना सरकारची दमछाक सुरू झाली. सरकार कोंडीत सापडले की, ते शासकीय कर्मचाऱ्यांनाच ‘खिंडीत’ पकडणार. त्यानुसार, जिल्ह्यातील साडेसात हजार जणांना कामाला लावण्यात आले आहे. त्यांना प्रभाग वाटून देण्यात आले आहेत. रोज १५ घरांची माहिती भरण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, परंतु ही माहिती भरतानाही अनेकांची दमछाक होत आहे.कारण खुल्या प्रवर्गातील घरातील सदस्याची माहिती भरताना एका घराला किमान अर्धा तास लागत आहे. ही माहिती घेऊन ती अपलोड करावी लागते. सही स्कॅन करून घ्यावी लागते. उलट आरक्षित जाती, जमातीच्या सदस्यांना फक्त तीनच प्रश्न विचारावे लागत असल्याने हे काम पटदिशी होते, परंतु कर्मचाऱ्यांना असे विविध अनुभव येत आहेत की, सर्वेक्षण करणारेही हैराण झाले आहेत.

अशी होते विचारणा

  • तुम्ही कशासाठी आला आहात, तुम्हाला हे कुणी करायला सांगितलं आहे?
  • तुमच्या गळ्यातील आय कार्ड खरं कशावरून?
  • फक्त मराठ्यांचं सर्वेक्षण करायचं, असा जीआर आमच्याकडे आहे, तुम्ही आम्हाला माहिती कशाला विचारताय?
  • आमचं ‘मराठा’ म्हणून नाव घालू नका, कुणबी म्हणून घाला, म्हणजे आम्हाला प्रमाणपत्र मिळेल.
  • आरक्षण असलेले विचारतात की, आमची माहिती कशाला घेताय?
  • अनेक वेळा दारच उघडले जात नाही, घरात मालक नाही, म्हणून सांगितले जाते.
  • झोपमोड कशाला करताय, म्हणून खेकसण्याचेही प्रकार

महिलांची स्वच्छतागृहांची अडचणअनेक महिला कर्मचारी, शिक्षिका या सर्वेक्षणात आहेत, परंतु त्यांना स्वच्छतागृहाची अडचण निर्माण होते. अखेर एखाद्या घरातील रागरंग पाहून, एखादा वयस्कर महिलेला विनंती केली जाते. सकाळची शाळा करून हे सर्वेक्षण करताना शिक्षक फेसाटायला लागले आहेत.

पुरुष सर्वेक्षक गल्लीत, महिला उपनगरातमहापालिका आणि पर्यवेक्षकांनी सर्वेक्षकांना प्रभाग देताना अजिबात विचार न केल्यासारखी परिस्थिती आहे. पुरुष शिक्षकांना गल्लीतील, पेठांमधील सर्वेक्षण दिले आहे, तर अनेक महिला या उपनगरामध्ये, नव्या वसाहतींमध्ये सर्वेक्षणासाठी पाठविल्या आहेत.

चहा घेणार का, जेवायला आमच्यात बसासर्वेक्षण करताना सगळेच अनुभव वाईट नाहीत. अनेक ठिकाणी चहा घेणार का, म्हणून विचारले जाते. आमच्याच घरात जेवायला बसा, म्हणून विनंती केली जाते. पार्किंगमध्ये डबा खायला कर्मचारी बसणार असतील, तर खुर्च्या दिल्या जातात, असे चांगले अनुभवही सर्वेक्षकांना येत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण