शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात फुटबॉल हंगामास १ डिसेंबरपासून प्रारंभ; हंगाम शिस्तबध्द होण्यासाठी केएसएने जाहीर केले ४७ नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:17 IST

केएसए साखळी स्पर्धेने हंगामाची सुरुवात : वेळापत्रक जाहीर : नियामावली, आचारसंहिता लागू

कोल्हापूर : फुटबॉल शौकिनांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या कोल्हापूरच्याफुटबॉल हंगामाचा प्रारंभ सोमवार दि. १ डिसेंबर रोजी होणार आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित शाहू छत्रपती केएसए लिग फुटबॉल स्पर्धेने हंगामास सुरुवात होणार आहे. सेक्रेटरी राजेंद्र दळवी, जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांनी स्पर्धेची माहिती दिली.संध्यामठ तरुण मंडळ आणि रंकाळा तालीम मंडळ यांच्यात १ वाजून ३० मिनिटांनी पहिली लढत होईल. उद्घाटनाचा सामना दुपारी चार वाजता पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्टस यांच्यात होणार आहे. दरम्यान, केएसएने स्पर्धेतील सामन्यांचे वेळापत्रक, नियम, आचारसंहिता तसेच संघांचे मानांकनही जाहीर केले आहे. सिनिअर- ८ गटातील सामने दुपारी १.३० वाजता आणि सुपर सिनियर-८ (वरिष्ठ गट) गटातील सामने सायंकाळी ४ वाजता होणार आहेत. हंगामात केएसए साखळी सामन्यातील स्पर्धेत विजयी संघाला तीन गुण मिळणार आहेत. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन शाहू छत्रपती केएसए साखळी फुटबॉल स्पर्धेतील ५६ सामन्यांचे वेळापत्रक तयार केले आहे. हंगाम शिस्तबध्द होण्यासाठी केएसएने सर्वसाधारण ४७ नियम जाहीर केले आहेत. संघ, व्यवस्थापन, खेळाडू, पदाधिकारी, प्रेक्षक, समर्थक यांनी या नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याशिवाय मैदानावरील आचारसंहिता, परगावी होणाऱ्या स्पर्धेत संघ व खेळाडू खेळविण्याबाबतचे नियमही जाहीर केले आहेत.पाटाकडील संघ अव्वल स्थानावरगतवर्षी झालेल्या शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लिग ए डिव्हिजन ते शारंग चषक फुटबॉल स्पर्धेनंतर मिळालेल्या गुणांनुसार समान गुण झालेल्या संघांमध्ये चिठ्ठ्या टाकून वरिष्ठ संघाचा मानांकन गुणतक्ताही केएसएने यावेळी जाहीर केला आहे. या यादीत पाटीकडील संघ अव्वल स्थानावर आहे.संघ आणि त्यांचे गूण-पाटाकडील तालीम मंडळ : ३८-खंडोबा तालीम मंडळ : ३६-श्री शिवाजी तरुण मंडळ : ३३-संयुक्त जुना बुधवार पेठ : २७-दिलबहार तालीम मंडळ : २५-वेताळमाळ तालीम मंडळ : २४-बालगोपाल तालीम मंडळ : २४-सम्राटनगर तरुण मंडळ : २१-संध्यामठ तरुण मंडळ : १६-झुंजार क्लब : १५-फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ : १५-उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ : १२-पाटाकडील तालीम मंडळ (ब) : १२-प्रॅक्टिस फुटबॉल क्लब : ९-सुभाषनगर फुटबॉल क्लब : ७-रंकाळा तालीम मंडळ : ६

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Football Season Starts December 1st; KSA Announces 47 Rules

Web Summary : Kolhapur's football season begins December 1st with the KSA League. The opening match is between Sandhyamath Tarun Mandal and Rankala Talim Mandal. KSA has announced 47 rules for the season, including match schedules and a code of conduct. Patakadil Talim Mandal tops the ranking list.