बाळूमामा मंदिराच्या अन्नछत्र व भक्तनिवासची पायाभरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST2021-01-13T05:00:52+5:302021-01-13T05:00:52+5:30
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा येथून भाविकांची मोठ्या संख्येने हजेरी असते. त्यांच्या राहण्यासह येथे अन्नछत्राची गरज होती. त्यामुळे देवस्थान समितीने ...

बाळूमामा मंदिराच्या अन्नछत्र व भक्तनिवासची पायाभरणी
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा येथून भाविकांची मोठ्या संख्येने हजेरी असते. त्यांच्या राहण्यासह येथे अन्नछत्राची गरज होती. त्यामुळे देवस्थान समितीने त्यांच्या सोयीच्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
या इमारतीसाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, १५ हजार स्क्वे. फूट इतके प्रशस्त बांधकाम होणार आहे. वर्षभरात ही इमारत भाविकांच्या सेवेसाठी पूर्ण करणार असल्याचे ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष पापा पाटील-कौलवकर, प्रशांत पत्की, राजेंद्र पाटील, बाबासाहेब पाटील, दयानंद पाटील, बळीराम मगर, देवाप्पा पुजारी, मोहन पाटील आदी उपस्थित होते.
कॅप्शन- मूळक्षेत्र मेतके येथील बाळूमामा मंदिराच्या भक्तनिवास व अन्नछत्र इमारतीचा पायाभरणी प्रारंभ करताना भगवान गिरी महाराज. यावेळी कोंडीबा महाराज व ट्रस्टचे पदाधिकारी.
छाया साताप्पा चव्हाण, बेनिक्रे