शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप; पुराचे पाणी कमी होऊ लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 11:58 IST

जिल्ह्यातील ४४० कुटूंबे अद्याप स्थलांतरितच

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली असून धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे ‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘वारणा’ धरणातून विसर्ग कमी झाल्याने पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी ४०.०१ फुटांपर्यंत खाली आली असून अद्याप ४३ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत आहे.कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावरील केर्ली (ता. करवीर) येथील पाणी ओसरल्याने दुपारनंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ४४० कुटुंबांतील १४९१ व्यक्ती व ३७० जनावरांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले.गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. शुक्रवारी सकाळपासून चांगली उघडीप देत सूर्यनारायणाने बराच काळ दर्शन दिल्याने कोल्हापूरकरांच्या मनातील महापुराची भीती काहीसी कमी झाली. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्या तरी तुलनेत पाऊस कमी राहिला.कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल, गडहिंग्लज तालुक्यात उघडीप राहिली. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सर्वाधिक ३० मिली मीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे.

राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंदशुक्रवारी (दि-२२) रात्री राधानगरी धरणाची सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाली आहेत. धरणातून बीओटी पॉवर हाऊस मधून १५०० क्युसेक इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.

तर वारणातून १६३० व दूधगंगा धरणातून ६१०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी हळूहळू कमी होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील ९९ खासगी मालमत्तांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. सोमवार (दि. २५) पर्यंत जिल्ह्यात उघडीप राहील, त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.जिल्ह्यातील ७६ मार्ग अद्यापही पाण्याखालीजिल्ह्यातील ८ राज्य मार्ग, २५ प्रमुख जिल्हा मार्ग, १२ इतर जिल्हा मार्ग तर ३१ ग्रामीण मार्ग असे ७६ मार्ग अद्याप पाण्याखाली आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी शुक्रवारीही कायम राहिली.

अलमट्टीचा विसर्ग २.५० लाख कायमअलमट्टी धरणातून प्रतिसेकंद २.५० लाख तर हिपरग्गी धरणातून २.२५ लाख घनफूट पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आल्याने पाण्याचा निचरा होत आहे.तालुकानिहाय स्थलांतरित कुटुंबेतालुका - कुटुंबे - व्यक्ती - जनावरे 

  • राधानगरी - ३९ - १७४ - १२६ 
  • कागल - १५ - ६१ - १२ 
  • कोल्हापूर शहर - २५ - ९७ - ० 
  • करवीर - ६७ - ८४ - १६ 
  • कागल (दुसरा) - ९ - ३७ - १२ 
  • हातकणंगले - २९ - ४९ - ११६ 
  • शिरोळ - २०९ - ८३५ - ३४ 
  • इचलकरंजी - ३० - ९६ - ६४