शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

Rain Update: कोल्हापुरात पावसाची उसंत, तरी पूरस्थिती जैसे थे; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ

By राजाराम लोंढे | Updated: August 13, 2022 12:54 IST

राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे बंद. सध्या दोन स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरुच

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली असली तरी पूरस्थिती जैसे थे आहे. पंचगंगेच्या पाणी पातळी घट न होता ती ४१.७ फुटांवरच स्थिर आहे. यात आज, शनिवारी पुन्हा १ इंचाने वाढ होवून ती ४१.८ फूट इतकी झाली आहे. अद्याप सात राज्य मार्ग व १९ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने ४४५६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. आतापर्यंत सात दरवाज्यापैकी पाच दरवाजे उघडले होते मात्र सद्या तीन दरवाजे बंद झाले आहेत.मागील गेली दोन दिवस पाऊस कमी आहे. दिवसभर कडकडीत ऊन तर अधून-मधून पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र, पुराचे पाणी कमी होताना दिसत नाही. राधानगरी, कुंभी, कासारी, तुळशी प्रकल्पातून विसर्ग सुरू असल्याने पाण्याची आवक कायम राहिली. अलमट्टी धरणातून प्रति सेकंद २ लाख २५ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज, शनिवारी दुपारी १२ वाजता पंचगंगेची पातळी ४१.८ फूट असून ती कालपासून स्थिरच आहे.

धामणी, तुळशी खोरे मोकळे होण्यास सुरुवात

पावसाने उघडीप दिली असली तरी धामणी, कासारी खोऱ्यातील पाणी पहिल्यांदा कमी होते. त्यानंतर कुंभी, भोगावती मग पंचगंगेची पातळी कमी होत जाते. शुक्रवारी दुपारनंतर धामणी व तुळशी खोरे हळूहळू मोकळे झाले.

पडझडीत १६.६९ लाखांचे नुकसान

शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात एक सार्वजनिक, तर ६२ खासगी मालमत्तांची पडझड होऊन १६ लाख ६९ हजारांचे नुकसान झाले आहे.

एसटीचे हे मार्ग बंद -कोल्हापूर ते गगनबावडाकोल्हापूर ते रत्नागिरी (केर्ली येथे पाणी)संभाजीनगर ते मानबेटगडहिंग्लज ते चंदगडचंदगड ते माणगावगगनबावडा ते भुईबावडाआजरा ते गारगोटी

धरणातून विसर्ग, प्रति सेकंद घनफूटमध्ये -राधानगरी - ४४५६तुळशी - १७५४वारणा- ९३७१दुधगंगा - ५८१६

पाऊस जरी थांबला असला तरी ५० किलोमीटर नदीपात्रात पाणी आहे. ते पुढे सरकेल तसे त्या परिसरातील पुराचे पाणी कमी होत जाते. उघडझाप अशीच राहिली तर आज, शनिवारपासून झपाट्याने पाणी कमी होऊ शकते. - रोहित बांदिवडेकर (कार्यकारी अभियंता, पाटबंधारे)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसKolhapur Floodकोल्हापूर पूर