कोल्हापूर लोकमतमध्ये विश्वास राऊत यांच्याहस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 15:47 IST2021-01-27T15:46:31+5:302021-01-27T15:47:46+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकमतच्या शिरोली औद्योगिक वसाहतीतील मुख्य कार्यालयात ज्येष्ठ कर्मचारी विश्वास राऊत यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात हा सोहळा झाला.

कोल्हापुरात लोकमतच्या शिरोली औद्योगिक वसाहतीतील मुख्यालयात ज्येष्ठ कर्मचारी विश्वास राऊत यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण झाले. देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात हा सोहळा झाला. (नसीर अत्तार)
कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकमतच्या शिरोली औद्योगिक वसाहतीतील मुख्य कार्यालयात ज्येष्ठ कर्मचारी विश्वास राऊत यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात हा सोहळा झाला.
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाचा सोहळा लोकमतमध्ये उत्साही वातावरणात साजरा केला जातो. एरवीही वर्षभर भारताची शान असलेला तिरंगा लोकमतच्या मुख्यालयावर डौलाने फडकत असतो. मुख्यालयाच्या आवारात सुंदर रांगोळी रेखाटली होती. देशभक्तिपर गीतांनी वातावरण भारावलेले होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला, ते राऊत मूळचे सांगलीचे असून मुद्रितशोधक म्हणून लोकमतमध्ये गेले एक तप ते काम करीत आहेत. त्यांच्याहस्ते महात्मा गांधी आणि स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी स्वागत केले. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. सर्वांनी भारतमातेचा जय-जयकार केल्यावर हा सोहळा संपला. यावेळी लोकमतचे संपादक वसंत भोसले यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.