कोल्हापूर महापालिकेच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:44 IST2018-12-15T17:42:18+5:302018-12-15T17:44:02+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, उपमहापौर भूपाल शेटे उपस्थित होते.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आपणास मिळालेल्या महापौरपदाच्या कार्यकाळात शहराच्या विविध समस्या तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासह शहर विकासासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात मूलभूत सेवासुविधा उपलब्ध करून देण्यावर माझा भर राहील, अशी ग्वाही महापौर मोरे यांनी दिली.
यावेळी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, उपमहापौर भूपाल शेटे, महिला व बालकल्याण सभापती सुरेखा शहा, प्राथमिक शिक्षण सभापती अशोक जाधव, सभागृह नेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर यांच्यासह महापालिकेचे सर्व अधिकारी, नगरसेवक उपस्थित होेते.