पाच वर्षीय अक्षरा माने हिचा ‘इंडिया बुक रेकॉर्ड’कडून सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST2020-12-15T04:41:01+5:302020-12-15T04:41:01+5:30
अक्षरा ही सुरुवातीला रंग ओळखू लागली. त्यानंतर एबीसीडी शिकली. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ती प्ले स्कूलमध्ये जाऊ लागली. मात्र, त्यापूर्वीच ...

पाच वर्षीय अक्षरा माने हिचा ‘इंडिया बुक रेकॉर्ड’कडून सन्मान
अक्षरा ही सुरुवातीला रंग ओळखू लागली. त्यानंतर एबीसीडी शिकली. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ती प्ले स्कूलमध्ये जाऊ लागली. मात्र, त्यापूर्वीच घरातून बऱ्यापैकी तयारी झाली असल्याने ती शाळेतील विविध स्पर्धांमध्ये अव्वलस्थानी राहिली. मराठी, हिंदी गाणी लक्षात ठेवणे तिच्या आवडीचा भाग आहे. तिची या स्वरूपातील सर्व तयारी तिची आई जान्हवी हिने करून घेतली आहे. २४ राज्ये आणि त्यांच्या राजधानी, पाच मराठी गाणी, विविध सहा सर्च इंजिन्स आणि त्यांचे संस्थापक, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शिखरे, आदी तिला तोंडपाठ आहेत. ही माहिती अक्षरा दोन ते तीन मिनिटांमध्ये सांगते. तिची ही अष्टपैलू कामगिरी आम्ही ऑनलाईन स्वरूपात ‘इंडिया बुक ऑफ द रेकॉर्ड’समोर सादर केले. तिच्या विक्रमाची नोंद करून तिला या ‘इंडिया बुक ऑफ द रेकॉर्ड’ने दि. १७ नोव्हेंबरला सन्मानित केले असल्याचे तिचे वडील किशोर माने यांनी सांगितले.
चौकट
‘किडस फॅशन’मध्ये ही यश
पुणे येथे इंटरनॅशनल किडस फॅशन रॅम्प वॉकमध्ये अक्षरा हिने तृतीय क्रमांक मिळविला होता. ‘बेटी बचाओ’ या विषयावर ती मराठी आणि इंग्रजीतून भाषणेही करते, असे किशोर माने यांनी सांगितले.
फोटो (१४१२२०२०-कोल-अक्षरा माने (बुक रेकॉर्ड)