शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांची मृत्यूशी झुंज अयशस्वी

By admin | Updated: October 6, 2015 01:11 IST

संदीप टिळे याचा मृत्यू : डॉल्बीच्या आवाजाने गॅलरी कोसळून झाला होता जखमी

शिरोली : गेली पाच वर्षे मृत्यूशी झुंज देणाऱ्या संदीप मधुकर टिळे (वय ३८) याने सोमवारी सीपीआरमध्ये अखेरचा श्वास घेतला. पाच वर्षांपूर्वी कोल्हापूर येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत भेंडे गल्ली येथे डॉल्बीच्या आवाजाने गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात तो जखमी झाला होता. हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही त्याची जगण्याची धडपड अखेर अयशस्वी ठरली. पाच वर्षांपूर्र्वी संदीप आपल्या कुटुंबाला घेऊन गणेश विसर्जन मिरवणूक बघायला गेला होता. महाद्वार रोडवरील भेंडे गल्लीत तो मिरवणूक बघत असताना डॉल्बीच्या आवाजाने इमारतीची गॅलरी कोसळली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. अन्य १६जण जखमी झाले होते. त्यात संदीपही गंभीर जखमी झाला होता. संदीपच्या पाठीवरच भिंत कोसळल्यामुळे कमरेखालील भागच तुटल्याने तो अधू झाला. गेल्या पाच वर्षांपासून तो अंथरुणावरच पडून होता. उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून संदीपची पत्नी घरीच त्याच्यावर उपचार करीत होती. या अपघातामुळे टिळे कुटुंबच उद्ध्वस्त झाले होते.मूळचा इस्लामपूरचा असलेला संदीप आपली पत्नी आणि दोन मुलांना घेऊन शिरोली माळवाडी भागात राहात होता. पत्नीला घर चालवणेही मुश्किल झाले होते. यात तब्बल पाच वर्षांनंतर इस्लामपूर येथील मित्रांना ही घटना समजली. त्यांनी पंधरा आॅगस्ट रोजी संदीपला दोन लाखांची मदत केली होती. तसेच कोल्हापूर येथील मराठा रियासत व्हॉटस अ‍ॅप ग्रुपनेही जखमी संदीप टिळेला २० हजाराची मदत केली होती. पण ही मदतही व्यर्थ ठरली. डॉल्बीमुळे कुटुंब उद्ध्वस्तडॉल्बी लावणारे, त्याच्यावर बेफाम होऊन नाचणारे नाचले, पण या डॉल्बीने टिळे कुटुंबाला उद्ध्वस्तच करून टाकले. संदीप टिळे याचा मृत्यू सर्वांना चटका लावणारा ठरला आहे. डॉल्बीचा घातक परिणाम या निमित्ताने ठळक झाला.चक्कर आली अन् कोमातसंदीपची रविवारी दुपारी अचानक तब्येत खालावली. चक्कर आल्याने त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये नेण्यात आले. पण तो कोमात गेला. सोमवारी दुपारी तीन वाजता त्याचा मृत्यू झाला.