कुमरी सरपंचांविरुद्ध पाच सदस्यांचे बंड
By Admin | Updated: January 14, 2015 23:35 IST2015-01-14T20:57:10+5:302015-01-14T23:35:20+5:30
पंचायत समितीकडे तक्रार : अविश्वास ठरावाची मागणी

कुमरी सरपंचांविरुद्ध पाच सदस्यांचे बंड
नेसरी : कुमरी (ता. गडहिंग्लज) गावच्या सरपंचांविरोधात उपसरपंचांसह अन्य चार ग्रामपंचायत सदस्यांनी बंड पुकारले असून, अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी गडहिंग्लज पंचायत समितीकडे तक्रार अर्ज दाखल केल्याची प्रत प्रसिद्धीस दिली आहे.
कुमरी येथे भैयासाहेब कुपेकर गटाची सत्ता असून, नितीन गोविंद वार्इंगडे हे सरपंच म्हणून कार्यरत आहेत. २८ नोव्हेंबर २०१२ रोजी सरपंच म्हणून वार्इंगडे व उपसरपंच म्हणून अनुबाई हरीबा पोळकर यांच्या बिनविरोध निवडी झाल्या होत्या.
दरम्यान, उपसरपंच पोळकर व सदस्य जयवंत कांबळे, शालन पाटील, प्रमिला कांबळे, कृष्णा दत्तू नाईक यांनी नोव्हेंबर २०१३ पासून ग्रामपंचायत कायदा १९५८ तरतुदीनुसार कामकाज होत नसल्याने विविध १० मुद्दे मांडून नियमानुसार काम झाले नसल्याचा आरोप पत्रकात केला आहे. यामध्ये शासनाकडून आलेला निधी, घरफाळा, पाणीपट्टी, आदी उत्पन्नातून खर्च केल्याचा कधीही व केव्हाही ठराव घेतला नसल्याचे सांगून खर्चामध्ये अपहार झाल्याचा आरोप केला आहे. असे विविध मुद्दे मांडून पंचायत समिती गडहिंग्लज गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करून अविश्वास ठरावाची पुढील कार्यवाही व्हावी, असे स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)
कुमरी गावच्या सात सदस्यांपैकी पाच सदस्यांचे बंड. सरपंचांच्या बाजूने एक, तर उपसरपंचांसह पाच सदस्य विरोधात उतरले.
सध्याची ग्रामपंचायत कृष्णराव वार्इंगडेंच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून, भैयासाहेब कुपेकर यांचे ते समर्थक आहेत.
अविश्वास ठरावासाठी तहसीलदार यांच्याकडे अर्ज न देता गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन पाठविल्याने विरोधक सदस्यांची प्रशासकीय परिपक्वता कमी असल्याची चर्चा