शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात चोरट्याने पाच सोनार दुकाने फोडली, सुमारे १५ तोळे सोने लंपास

By सचिन भोसले | Updated: September 30, 2023 14:10 IST

कोल्हापूर : कासार गल्ली (गुजरी) तील एका इमारतीच्या तळमजल्यावर पाच बंगाली कारागीरांची सोने आटणीची दुकाने आहेत. ही पाचही दुकाने ...

कोल्हापूर : कासार गल्ली (गुजरी) तील एका इमारतीच्या तळमजल्यावर पाच बंगाली कारागीरांची सोने आटणीची दुकाने आहेत. ही पाचही दुकाने शनिवारी पहाटे चोरट्याने फोडली. या चोरीत सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने दागिने लंपास केले. पोलिसांनी तत्काळ ठसे तज्ज्ञांना पाचारण करीत तपासास सुरुवात केली. गुजरीजवळील कासार गल्लीत सोने घडणावळीसह आटणीची मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. याशिवाय सोन्याचे व बिस्कीट स्वरूपात घाऊक विक्री करणारेही व्यापारी मोठ्या संख्येने आहेत. अशाच एका इमारतीच्या तळमजल्यावर बंगाली कारागीरांची  पाच दुकाने आहेत. ही दुकाने कारागीरांनी काम आटपल्यानंतर शुक्रवारी रात्री बंद केली होती.  शनिवारी मध्यरात्री १ वाजून ४० मिनिट ते ४ वाजून २० मिनिटांपर्यंत बुरखाधारी चोरट्याने तळमजल्याकडे जाणारे प्रवेशदारावरील कुलुप तोडून प्रवेश केला. पायऱ्या उतरल्यानंतर पहिले सोन्याच्या दागिन्यांवर कलाकुसरीसाठी लागणारे कारागीर साहित्याचे दुकान चोरट्याने फोडले. त्यानतंर पुढील सलग चार दुकानांची कुलपे त्याने कटरने तोडली. प्रत्येक दुकानांमध्ये प्रवेश केल्यानंतर चोरट्याने तेथील घडणावळीसाठी आलेले सोन्याचे दागिने उचलले. ही बाब शनिवारी सकाळी कारागीर दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर निदर्शनास आली . दुकान मालकाने जुना राजवाडा पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. अधिक तपासासाठी ठसेतज्ज्ञांसह श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानूसार सुमारे १५ तोळे सोन्यावर चोरट्याने डल्ला मारल्याचे सांगण्यात आले.  पोलिसांनी तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एक बुरखाधारी चोरटा दिसून आला. दरम्यान पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी, प्रशिक्षणाथी पोलिस उपअधीक्षक रविंद्र भोसले, पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव, सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील आदींनी भेट देऊन दुकानांची पाहणी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस