शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

परितेतील गर्भलिंग चाचणीप्रकरणी सुत्रधार राणी कांबळे फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 19:18 IST

Crimenews Kolhapur : परिते ( ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग तपासणी केंद्रावर छापा टाकून पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील पाच जणांना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार राणी कांबळे (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) ही फरार आहे. या प्रकरणात साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देपरितेतील गर्भलिंग चाचणीप्रकरणी सुत्रधार राणी कांबळे फरार पाच जणांना अटक: सात जणांविरोधात गून्हा

कोल्हापूर : परिते ( ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग तपासणी केंद्रावर छापा टाकून पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील पाच जणांना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार राणी कांबळे (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) ही फरार आहे. या प्रकरणात साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

घर मालक साताप्पा कृष्णा खाडे ( वय ४२, रा. परिते, ता. करवीर), गर्भलिंग निदानासाठी आणलेल्या महिलेचा पती अनिल भीमराव माळी ( ३६) एजंट भारत सुकूमार जाधव ( ३६, रा दोघेही : हूपरी, ता. हातकणंगले), एजंट सचिन दत्तात्रय घाटगे ( ४२, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी), बनावट डॉक्टर महेश सुबराव पाटील ( ३०, रा. सिरसे, ता. राधानगरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  राजमाता यशवंत माळी ( ६३, रा. हूपरी, ता. हातकणंगले) या वयोवृध्द असल्याने नोटीस देण्यात आली आहे.परिते येथील साताप्पा खाडे यांच्या घरामध्ये अवैधरित्या गर्भलिंग तपासणी केंद्र असल्याची माहिती शहर पोलीस उप अधीक्षक चव्हाण यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथक पाठवून रविवारी खाडे यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी गर्भलिंग तपासणी होत असल्याचे समोर आले.

दरम्यान, पोलीस आल्याची चाहूल लागताच गर्भलिंग तपासणी केंद्र चालवणारी राणी कांबळे फरार झाली. मात्र पोलिसांनी तिचा सहकारी बनावट डॉक्टर महेश पाटील, एजंट सचिन घाटगे, भारत जाधव, घर मालक सातापा खाडे, अनिल माळी या पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून ३० हजार १०० रुपयांची रोकड, एक सोनोग्राफी मशीन, औषधे व इंजेक्शन असा सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

करवीरच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुवर्णा पाटील, इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी योगिता अग्रवाल, खूपिरे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सरिता थोरात, परिते आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका मीरा भांगरे, आरोग्य सेवक जालिंदर काताडे, अ‍ॅड. गौरी पाटील यांच्या पोलीस पथकाने कारवाईमध्ये सहभाग घेतला.

परितेमधील गर्भलिंग तपासणी प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कडक कारवाई होईल. या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्याचे काम सुरू आहे.-शैलेश बलकवडे,जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर