शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा नदीपात्रात हजारो मासे पडले मृत्युमुखी, प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले पाण्याचे नमुने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 13:35 IST

अहवाल आल्यानंतर या माशांच्या मृत्यूचे कारण निश्चितपणे सांगण्यात येईल

कोल्हापूर : कसबा बावडा शिये पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले होते. प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळाने याठिकाणच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याची तपासणी झाल्यानंतर चार दिवसांत अहवाल आल्यानंतर या माशांच्या मृत्यूचे कारण निश्चितपणे सांगण्यात येईल, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी मंगळवारी दिली.पंचगंगा नदीच्या शिये पुलाजवळील नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे हे मासे मृत्यू पावल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. हे हजारो मासे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असल्याचे चित्र होते. हा प्रकार गेली दोन वर्षे सुरू असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. येथील पाणी काळसर, हिरवट रंगाचे असल्याने या नदीपात्रात रसायन मिसळत असावे, असा अंदाज आहे. हे पाणी प्रवाहित नसल्यामुळे येथील माशांना ऑक्सिजन मिळत नसावे.या वृत्ताची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली असून, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी या परिसरातील पाण्याचे नमुने घेतले. या नमुन्याचा अहवाल दोन दिवसात उपलब्ध होईल, त्यानंतर या माशांच्या मृत्यूचे कारण समजेल, अशी माहिती मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी दिली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण