शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात प्रथमच आकर्षक गोल बुबुळाच्या पालीची नोंद

By संदीप आडनाईक | Updated: June 14, 2023 15:19 IST

केरळ-तामीळनाडू येथून येणाऱ्या लाकडांच्या वाहतुकीसोबत 'टिंबर मार्केट' परीसरात स्थलांतर

कोल्हापूर : येथील टिंबर मार्केट परिसरातून प्रथमच आकर्षक 'निमास्पीस' या प्रजातीच्या गोल बुबुळाच्या पालीचा आढळ शिवाजी विद्यापीठाच्या अक्षय खांडेकर आणि इतर संशोधकांनी शोधला आहे. यासंदर्भात 'निमास्पीस ग्रासीलीस' या गोल बुबुळाच्या पालीच्या आढळ क्षेत्राची व्याप्ती आणि पुनर्वर्णन करणारा शोधनिबंध 'झूटॅक्सा' या अंतराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून प्रकाशीत झाला आहे. या संशोधनात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल तसेच शिवाजी विद्यापीठाचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक सुनिल गायकवाड आणि बीएनएचएसचे सौनक पाल यांचा सहभाग आहे. हा शोधनिबंध प्रा. सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठात सुरु असलेल्या अक्षय खांडेकर यांच्या पीएचडी संशोधनाचा भाग आहे. 'निमास्पीस ग्रासीलीस' या गोल बुबुळाच्या पालीचा शोध १८७० मध्ये रिचर्ड बेडोम या ब्रिटीश संशोधकाने लावला. अंगावरील आकर्षक रंग आणि छोट्या आकारांवरुन या पाली लक्ष वेधून घेतात. त्यांच्या या आकर्षक रंगावरुनच त्यांचे नामकरण 'ग्रासीलीस' असे केले आहे. मूळ संशोधन पत्रिकेमधे ही पाल पालघाटच्या पर्वतांवर मिळाल्याचे नमूद केले आहे. पश्चिम घाटाला दक्षिण आणि मध्य अशा दोन भागांत खंडीत करणारा 'पालघाट गॅप' हा केरळ आणि तमिळनाडू या राज्यांत पसरलेला आहे. या संशोधनामध्ये ही पाल पालघाट गॅपच्या साधारणतः ७० कि.मी. परिघात आढळून आली. 'निमास्पीस ग्रासीलीस' ही पाल तिचा नैसर्गिक अधिवास सोडून इतरत्र आढळल्याची या संशोधनात ही पहिलीच नोंद आहे. टिंबर मार्केट परिसरात ही पाल प्रथमतः विवेक कुबेर यांच्या निदर्शनास आली. 

केरळ-तामीळनाडू येथून येणाऱ्या लाकडांच्या वाहतुकीसोबत या परीसरात ही पाल असावी. ''टिंबर मार्केट परिसरात ही पाल घरांच्या भिंती, लाकडांचे ओंडके आणि झाडांवरती आढळून आली.'' -विवेक कुबेर 

 ''मानवी हस्तक्षेपामुळं नैसर्गिक अधिवासाच्या बाहेर होणाऱ्या प्राण्यांच्या प्रसाराचा त्या अधिवासावर आणि त्या प्राण्यांवर काय परीणाम होते हे तपासण्यासाठी दिर्घकालीन संशोधन करण्याची गरज आहे.'' - प्रा. सुनिल गायकवाड.

 'निमास्पीस ग्रासीलीस' ही पाल छोटा आकार आणि आकर्षक रंगामुळे स्पष्टपणे वेगळी ओळखता येते. या पालींचे नर माद्यांपेक्षा अधिक आकर्षक असतात. या पाली दिनचर असून दिवसा आपले भक्ष्य पकडण्यासाठी बाहेर पडतात.'' - अक्षय खांडेकर. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरResearchसंशोधन